आगीच्या अफवांनी घेतले 13 रेल्वे प्रवाशांचे बळी : 11 प्रवाशांची ओळख पटवण्यात यंत्रणेला यश


Baby dies after falling into fire in Nandra Khurd village. Fire rumours claim 13 train passengers’ lives: System succeeds in identifying 11 passengers जळगाव (23 जानेवारी 2025) : आगीच्या अफवेने प्रवाशांनी पुष्पक एक्स्प्रेसमधून उड्या घेताच समोरील ट्रॅकवरून जाणार्‍या कर्नाटक एक्स्प्रेसने 13 प्रवाशांना चिरडले होते तर 11 प्रवासी यात जखमी झाले होते. या घटनेतील 11 प्रवाशांची ओळख पटवण्यात यश आले असून दोघांची ओळख पटवली जात आहे.

या प्रवाशांची पटली ओळख
रेल्वे अपघातात मैसारा नंदराम विश्वकर्मा (40), लच्छी राम पासी (40), कमला नवीन भंडारी (42), राधेश्याम राम अग्नूरद (40), हिनू नंदराम विश्वकर्मा (9) नंदराम पद्म विश्वकर्मा (40), जवकला भट्टू जयगडी (60, सर्व रा.नेपाळ) बाबू खान मोहम्मद शफीखान (27), इम्तीयाज अली (34), शिवकुमार पृथ्वीराज चव्हाण (40), नसरुद्दीन बद्रुद्दीन सिद्दिकी (18, सर्व रा. उत्तर प्रदेश) यांची ओळख पटली असून दोन अनोळखींची पुरुषांची ओळख पटवली जात आहे.

अपघातात हे झाले जखमी
कमला विक्रम विश्वकर्मा (35), राकेश जयगडी (13), सुशील विक्रम विश्वकर्मा (8), करिष्मा विक्रम विश्वकर्मा (5), पियुष मोहन जयगडी (19) रंगीलाल पासी (32), रघुवीर चंदेरी तेली (35), शौकत अली तेली (45), नूर मोहम्मद तेली (30), इमरान अली सिद्दिकी (25), रहमान अली सिद्दिकी (15), मोहम्मद समीर सिद्दिकी (32), रिजवान सिद्दिकी (15), रामरंग पासी (23) हे जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !