मालेगावात बांगलादेशींना जन्म दाखले दिल्याचा ठपका : बोदवड तहसीलदार नितीन देवरे निलंबित

किरीट सोमय्या यांच्या तक्रारीअंती कारवाई : देवरे मालेगावचे तत्कालीन तहसीलदार


Accused of giving birth certificates to Bangladeshis in Malegaon: Bodwad Tehsildar Nitin Deore suspended भुसावळ (23 जानेवारी 2025) : मालेगावचे तत्कालीन व बोदवडचे विद्यमान तहसीलदार नितीनकुमार देवरे यांना शासनाने सेवेतून निलंबित करण्याचे आदेश गुरुवारी काढताच महसूल वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. मालेगावात कर्तव्यावर असताना बांग्लादेशींना जन्म दाखला दिल्याचा ठपका ठेवत शासनाने ही कारवाई केली आहे.

बांगलादेशी रोहिंग्यांना मालेगावात जन्म दाखले देण्यात आल्याची तक्रार किरीट सोमय्या यांनी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्यानंतर महसूल वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.


असे आहे नेमके प्रकरण
माजी खासदार आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मालेगावात बांग्लादेशींना वारेमाप जन्म दाखले वाटप झाल्याची तक्रार शासनाकडे केली होती व बांग्लादेशींचे बेकायदा असलेल्या वास्तव्याबाबतही आवाज उठवला होता. लोकसभा निवडणूक काळात सोमय्या यांना मालेगावातील वोट जिहाद प्रकरणात आवाज उचलल्यानंतर मोठ्या प्रमाणावर रोकड जप्तीची कारवाईही होवून काहींना अटक झाली होती.

नायब तहसीलदारही निलंबित
किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर व आरोपानंतर शासनाकडून दखल घेण्यात आली व गुरुवार, 23 रोजी बोदवडचे विद्यमान तहसीलदार व मालेगावचे तत्कालीन तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्यासह नायब तहसीलदार संदीप धारणकर यांना शासनाने निलंबित केले आहे. धारणकर यांची विभागीय चौकशी होणार आहे. देवरे यांच्या निलंबन काळात जळगाव हे मुख्यालय असेल शिवाय त्यांना या काळात कोणताही व्यवसाय करता येणार नाही तसेच धारणकर यांचे मुख्यालय नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय असेल.

मला बळीचा बकरा केले : तहसीलदार
बांग्लादेश रोहिंग्या प्रकरणात माझे नाव घेण्यात आले परंतु निलंबन नेमके कशाच्या आधारे करण्यात आले याची आपल्याला कल्पना नाही मात्र मला बळीचा बकरा बनवण्यात आले, असे निलंबित तहसीलदार नितीनकुमार देवरे म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !