जळगावात हॉटेल शेजारुन दुचाकी लांबवली
जळगाव (24 जानेवारी 2025) : हॉटेल शेजारी हॅन्डल लॉक केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरुन नेली. ही घटना मंगळवार, 14 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास शहरातील काशीनाथ हॉटेलजवळ घडली.
प्रकाश देविदास सोनवणे (वय 47,रा. गुरुदत्त कॉलनी) हे रात्री 8.15 वाजेच्या सुमारास हिरो डिलक्स ( क्रमांक एमएच19 सीके 6724) दुचाकीने आले. हॉटेलच्या शेजारी त्यांनी दुचाकी पार्किंग केली. त्यानंतर ते कामाला निघुन गेले. रात्री ते दुचाकी घेण्यासाठी आले असता दुचाकी गायब झाल्याचा प्रकार समोर आला. त्यांनी परिसरात शोध घेतला असता तपास लागला नाही. या प्रकरणी तक्रारीनुसार, सोमवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. तपास पोलीस हवालदार गणेश शिरसाळे हे करीत आहेत.







