जळगावात चोरटे शिरजोर : घरातून दोन मोबाईलसह रोकड लांबविली
जळगाव (24 जानेवारी 2025) : मोबाईल चार्जिंगला लावून कारागीर आंघोळीसाठी बाथरुममध्ये गेल्याची संधी साधत चोरट्याने बिनधास्तपणे रुममध्ये प्रवेश केला. चार्जिंगला लावलेले दोन मोबाईल, रोख दहा हजार मिळून 21 हजारांचा मुद्देमाल लांबवण्यात आला. ही घटना शहरात काँग्रेस भवनासमोर जैन मंदिराच्या मागील इमारतीमध्ये घडली.
काय घडले नेमके
बनामली गोपाल मलिक (45, मूळ रा.केसरपुर, ता.सोरो, राज्य ओरिसा, हमु जैन श्वेतांबर मंदिरामागे) येथे राहतात. ते मुर्ती कारागीर आहेत. येथे काम सुरु असल्याने ते इमारतीच्या एका रुममध्ये वास्तव्य करतात. नेहमीप्रमाणे संध्याकाळी कामावरुन ते रुमवर आले. सहा हजार किमतीचा व पाच हजार किमतीचा असे दोन मोबाईल चार्जिंगला लावले. त्यानंतर ते आंघोळ करण्यासाठी बाथरुममध्ये गेले. चोरट्याने या रुमध्ये प्रवेश करत दोन मोबाइल व रो रोख दहा हजाराची दहा हजाराची रोकड असा सुमारे 21 हजाराचा मुद्देमाल घेत पलायन केले. बाथरुममधुन कारागीर बाहेर पडल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस हवालदार उमेश भांडारकर हे करीत आहेत.