भुसावळातील नरीमन हॉटेल फसवणूक प्रकरण : दोघा संशयीतांना अटकपूर्व जामीन मंजूर
भुसावळ (24 जानेवारी 2025) : शहरातील हॉटेल नरीमनच्या संचालकाची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांविरोधात बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणातील संशयीतांना भुसावळ सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
भुसावळ शहरातील अदिल रुसी एन.कावीना यांच्या फिर्यादीवरून संशयीत कृष्णा संजय उपाध्याय व सुनील नारायण तिवारी (रा.विठ्ठल मंदिर वॉर्ड) यांच्याविरोधात 2 जानेवारीला गुन्हा दाखल आहे. संशयीतानी या गुन्ह्यात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांना अटकपूर्व जामीन शनिवार, 18 रोजी मंजूर करण्यात आला. संशयीतांतर्फे अॅड.राजेंद्र टी.राय यांनी काम पाहिले.