धुळ्यात सेवानिवृत्त फौजदाराचे घर फोडले


धुळे (24 जानेवारी 2025) : धुळ्यात चोरट्यांनी चक्क सेवानिवृत्त फौजदाराचे घर फोडल्याचा प्रकार समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. धुळ्यातील देवपूर भागातील उन्नतीनगरात सेवानिवृत्त उपनिरीक्षक धर्मसिंग परदेशी वास्तव्यास आहे. ते गावी गेल्याची संधी साधत चोरट्यांनी 15 हजारांची रोकड व देवघरातून चांदीच्या मूर्ती लांबवल्या.

देवपूर पोलिसात गुन्हा दाखल
परदेशी हे बायपास शस्त्रक्रियेसाठी नाशिकला आल्यानंतर चोरट्यांनी बंद घरात घरफोडी केली. शस्त्रक्रियेनंतर परदेशी यांचा मुलगा आल्यानंतर घरफोडीचा प्रकार समोर आला. पश्चिम देवपूर पोलिसांना कळवल्यानंतर यंत्रणेने धाव घेतली. पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.


कॉपी करू नका.