जामठीत घरासह चार दुकाने फोडली : व्यावसायिकांमध्ये खळबळ

चोरट्यांना रोखण्याचे पोलिसांपुढे आव्हान : लाखो रुपयांचा ऐवज लंपास


Four shops including a house were broken into in Jamthi : There is excitement among businessmen जामठी (24 जानेवारी 2025) : गावातील एका घरासह चार दुकानांना चोरट्यांनी टार्गेट करीत रोकडसह लाखो रुपयांचा ऐवज लांबवला. या घटनेने गावातील ग्रामस्थांसह व्यावसायीकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

घरे व दुकानांना केले टार्गेट
बुधवार, 22 रोजी मध्यरात्री रात्री एक ते तीन वाजेच्या सुमारास जामठी येथील किराणा दुकानाचे व्यापारी राजेंद्र चौधरी यांचे किराणा दुकान तसेच संजय तपे यांच्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली तसेच तसेच भारत पान सेंटर, अमोल गोसावी पान सेंटर, क्रिष्णा पाटील यांच्याकडे घरफोडी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरट्यांनी घरांसह दुकानांमध्ये धाडसी चोरी केल्याने व्यावसायीक व ग्रामस्थ धास्तावले आहेत.

चोरट्यांचे वाहन सीसीटीव्हीत कैद
चोरट्यांनी मोठ्या शिताफीने दुकान फोडण्याच्या अगोदर दुकानासमोर मोटरसायकल लावून चोरीचा प्रयत्न केला आहे मात्र समोरील सीसीटीव्हीत हे वाहन कैद झाले आहे. चोरट्यांनी चोरीसाठी मोटरसायकलचा वापर केला. या वाहनाद्वारे चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.

गस्त वाढवण्याची अपेक्षा 
पोलिसांनी गस्त वाढवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. जामठी हे तालुक्यातील मोठे व बाजारपेठेचे गाव आहे. या ठिकाणी ग्रामस्थांनी छोटे-मोठे व्यवसाय थाटले असून चोरीच्या प्रकारामुळे व्यावसायीक घाबरले आहे. दोन महिन्यांत शेतकर्‍यांच्या मोटारीसहीत केबलची चोरी करीत पोबारा केला त्यामुळे जामठी परिसरात पोलिसांनी गस्त वाढवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

ग्रामपंचायतीचे सीसीटिव्ही धूळखात
गतवर्षी ग्रामपंचायतीने लाखो रुपयांचा निधी खर्च करुन गावात सीसीटीव्ही बसविले होते मात्र वर्षभरातच त्यांची दयनीय अवस्था झाली. काही बंद तर काही दिशा चुकवून लावण्यात आले आहेत. ग्रामपंचायतीने तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


कॉपी करू नका.