17 हजारांची लाच घेताना एपीआयसह पीएसआय एसीबीच्या जाळ्यात
ACB catches API and PSI while taking bribe of Rs 17,000 नांदेड (24 जानेवारी 2025) : कुंडलवाडी पोलिस सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे व पोलिस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांना 17 हजारांची लाच घेताना एसीबीने अटक केल्याने पोलिस वर्तुळात खळबळ उडाली आहे.
वाळूवर कारवाई न करण्यासाठी भोवली लाच
तक्रारदाराच्या हायवा वाहनाने कायदेशीर परवानगी असलेल्या वाळूच्या ठेक्यावरून ते ऑर्डर मिळाल्याप्रमाणे वाळू वाहतूक करतात. त्यांचे वाळू वाहतुकीचे हायवा वाहन कुंडलवाडी पोलिस ठाणे हद्दीतून वाळू वाहतूक करताना त्यावर कारवाई न करण्यासाठी पोलिस उपनिरीक्षक नारायण मारोतराव शिंदे यांनी स्वतःसाठी दहा हजार रूपये आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक भागवत तुकाराम नागरगोजे यांच्यासाठी 15 हजार मागितली.
कार्यरत पोलिस ठाण्यातच दाखल झाला गुन्हा
तडजोडी अंती शिंदे यांनी स्वतःसाठी सात हजार रुपये आणि नागरगोजे यांच्यासाठी दहा हजार रुपये देण्याचे ठरले मात्र वाळू वाहतूकदाराने एसीबीला कळवताच पडताळणी झाली व सापळा लागला. उपनिरीक्षकाने स्वतःचे आणि सहाय्यक पोलीस निरीक्षकाचे एकूण 17 हजार रुपये स्वीकारताच दोघांना अटक झाली. विशेष म्हणजे ज्या पोलीस ठाण्यात होते, त्याच कुंडलवाडी ठाण्यात दोघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.