धुळ्यात गुन्हे शाखेची धडक कारवाई : बनावट दारू कारखाना उद्ध्वस्त : सहा आरोपींना बेड्या
मुख्य सूत्रधार पसार ः पावणेतीन लाखांची बनावट दारू जप्त
Crime Branch takes drastic action in Dhule : Fake liquor factory destroyed : Six accused arrested धुळे (24 जानेवारी 2025) : धुळ्यातील चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जामचा मळा परिसरातील सोमैय्या हॉलमागील घरात बनावट दारूचा कारखाना सुरू असल्याची माहिती धुळे गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पथकाने गुरुवारी छापेमारी करीत सुमारे तीन लाखांचा बनावट दारूचा मद्यसाठा जप्त केला तर सहा आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. या कारवाईने बनावट मद्य निर्मिती करणार्यांच्या गोटात खळबळ उडाली आहे. संशयीतांविरोधात चाळीसगाव रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय बातमीदारामार्फत बनावट दारू घरात बनवली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिले. चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जामचा मळा परिसरातील सोमैय्या हॉल मागील शेख जावेद शेख मोहम्मद उर्फ जावेद नक्ट्या हा त्याच्या राहत्या घरात बेकायदेशीररित्या देशी बनावटीची दारू अवैधरित्या तयार करून ती गुजरात व इतर ठिकाणी विक्रीसाठी पाठवत असताना पथकाने छापा टाकला.
पावणेआठ लाखांचा मुद्देमाल जप्त
संशयीताच्या घरातून पथकाने दोन लाख 38 हजार 560 रुपये किंमतीची संत्रा दारू, 30 हजार रुपये किंमतीचे बाटलीचे बुच पॅक करण्याचे मशीन , हॅण्ड मिक्सर मशीन, 150 बूच, कागदी बॉक्सचे गठ्ठे, 10 ड्रम, प्लॅस्टीकची टाकी, 15 हजार रुपये किंमतीच्या तीन हजार दारूच्या रिकाम्या बाटल्या तसेच पाच लाख रपुये किंमतीचे चारचाकी वाहन (एम.एच 01 ए.आर. 4516) मिळून सात लाख 95 हजार 60 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सहा आरोपींना अटक :सात जणांविरोधात गुन्हा
शेख जावेद शेख मोहम्मद उर्फ जावेद नकट्या (मोगलाई, हल्ली मुक्काम जामचा मळा), विशाल विनायक गायकवाड (कालिका मंदिरजवळ, पिंपळनेर), तौसीफ शेख निरोद्दीन शेख (जामचा मळा. धुळे), शेख तनवीर शेख नुरुद्दीन. (हजार खोली, धुळे), शेख तौफिक नुरोद्दीन (हजार खोली धुळे), शेख इरफान शेख अल्ताफ (जामचा मळा), गौतम नरेंद्र माळी (फुलेनगर, मोगलाई धुळे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मुख्य आरोपी शेख जावेद शेख मोहम्मद उर्फ जावेद नक्ट्या विरोधात चाळीसगाव रोड ठाण्यात दोन व धुळे शहर पोलीस ठाण्यात दोन असे चार गुन्हे दाखल आहेत तर दुसरा आरोपी विशाल विनायक गायकवाड याच्यावर शिरपूर तालुका, साक्री पोलीस स्टेशन, धुळे तालुका, पंचवटी, नाशिक व पिंपळनेर पोलीस स्टेशन येथे पाच गुन्हे दाखल आहेत. मुख्य आरोपी शेख जावेद शेख मोहम्मद उर्फ जावेद नकट्या हा फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत तर उर्वरीत आरोपींना अटक करण्यात आली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, हवालदार मच्छिंद्र पाटील, हवालदार हेमंत बोरसे, हवालदार प्रल्हाद वाघ, हवालदार योगेश चव्हाण, हवालदार प्रशांत चौधरी व हवालदार कैलास महाजन आदींच्या पथकाने केली.