जळगाव अपघात कायम भरधाव डंपरच्या धडकेने ट्रॅक्टवरील तरुण ठार


Jalgaon accident continues, youth on the tract killed after being hit by a speeding dumper जळगाव (26 जानेवारी 2025) : शहरातील दूध फेडरेशन जवळील भाग्यश्री पेट्रोल पंपाजवळ विटा घेऊन जाणार्‍या ट्रॅक्टरला भरधाव दिलेल्या धडकेत एक जण जागीच ठार झाला तर तिघे गंभीर जखमी झाले. हा अपघात शनिवार, 25 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडला. डंपर ताब्यात घेण्यात आला. अंकुश आत्माराम भील (27, रा.डिकसाई ताम, जळगाव) असे मयताचे नाव आहे.

असा घडला अपघात
जळगाव शहरातील दूध फेडरेशन जवळील भाग्यश्री पेट्रोल पंपाजवळून ट्रॅक्टर क्रमांक (एम.एच.19 ए.एन.2906) विटा घेऊन जात असताना तेथील वळणजवळ मागून येणार्‍या डंपर हा ओव्हरटेक करत असताना ट्रॅक्टरला कट मारला तेवढ्यात ट्रॅक्टर पलटी झाले. त्यामुळे ट्रॅक्टरवर बसलेला अंकुश भील हा ट्रॅक्टर खाली दाबला गेल्याने त्याचा जागेवरच मृत्यू झाला तर त्याच्यासोबत असलेले सुनील मधुकर भील (22), गणेश भगीरथ भील (18), आणि शुभम सुखा भील (20, तिघे राहणार इदगाव, ता.जळगाव) हे तीन जण गंभीर जखमी झाले.

त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान घटनास्थळी नागरिकांनी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले होते. या घटनेची माहिती मिळतात जळगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच डंपर हा ताब्यात घेतला आहे.

मयत अंकुशच्या पश्चात आई-वडील, पत्नी,दोन मुले एक मुलगी असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 


कॉपी करू नका.