सागवान तस्करांची दादागिरी : वाहन अंगावर घातल्याने वनरक्षक जखमी

एक लाख 14 हजारांच्या सागाच्या लाकडांसह मोटारसायकल जप्त


Teak smugglers’ brutality : Forest guard injured after vehicle rams him चोपडा (27 जानेवारी 2025)  चोपडा वनक्षेत्रातील चौगाव वनकक्षात काल मध्यरात्री वनखात्याचे अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी केलेल्या कारवाईत णक लाख 14 हजाराच्या सागाच्या लाकडांसह सागवान तस्करांची मोटारसायकल जप्त करण्यात आली . यावेळी प्रतिबंध करताना सागवान तस्करांनी वाहन अंगावर घातल्याने वनरक्षक प्रकाश पाटील जखमी झाले चोपड्याच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत

काय घडले नेमके ?
चोपड्याच्या वन परिक्षेत्र अधिकार्‍यांना 24 जानेवारी रोजी रात्री साडेबारा वाजता खबर्‍यांकडून गुप्त माहिती मिळाली की, चौगाव कक्षात सागवानाची अवैध वृक्षतोड चालू आहे . या माहितीच्या आधारे वन खात्याच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळ गाठत आरोपींना अटकाव करण्याचा प्रयत्न केला याच झटापटीत सागवान तस्करांनी वाहन अंगावर घातल्याने वनरक्षक प्रकाश पाटील जखमी झाले त्याचवेळी या तस्करांची मोटारसायकल आणि त्यांच्या ताब्यातील 3 हजार रुपये किमतीचे सागाच्या लाकडाचे 8 मग जप्त करण्यात आले नंतर जखमी वनरक्षक प्रकाश पाटील यांना चोपड्याच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर आज सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे, चोपड्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी बी के थोरात , वनरक्षक प्रकाश पाटील यांच्यावरील उपजिल्हा रुग्णालयातील उपचारांची माहिती घेतल्यावर चौगाव शिवारातील एका शेतात जाऊन आरोपी संजय कोळी याच्या घराची झडती घेतली आणि लाकूड कापण्याच्या अवजारांसह यंत्रे व 1 लाख 14 हजार 644 रुपयासारख्या सागाच्या लाकडांचे मग जप्त केले.


यांनी केली कारवाई
ही कारवाई वनसंरक्षक श्रीमती निनू सोमराज , यावलचे उपवनसंरक्षक जमीर शेख , विभागीय वनाधिकरी आर आर सदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हाडपे , चोपड्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी बी के थोरात , वनपाल आर एस मोरे, अमोल पाटील , वनरक्षक शुभम पाटील , रोहित पावरा , शाळीग्राम कंखरे, संदीप पावरा , जनार्दन गुट्टे , श्रीमती रीला पावरा , सरला भोई , सोनाली पावरा अनिता बारेला , पिंकी कोठारी , पोप्या बारेला , गोविंद चौधरी , मदन मराठे वाहन चालक मनोज मोरे , रावा लोळी , रवी भिल , रतीलाल भिल , भुरसिंग बारेला यांनी केली.

आरोपी सवयीचे गुन्हेगार
या कारवाईत सापडलेले आरोपी सवयीचे गुन्हेगार आहेत त्यामुळे त्यांच्याकडून आणखी संशयितांचा माग काढण्याचा प्रयत्न सुरु आहे कारवाईवेळी अंधारात त्याच्या वाहनासह फरार झालेला दुसरा आरोपी सापडल्यावर त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे हे जंगल सागवानाच्या झाडांसाठी ओळखले जाते येथून हे आरोपी थोडे-थोडे लाकूड चोरतात आणि सागवानाच्या वस्तू तयार करणार्‍यांना ते विकतात हे रॅकेटच उद्ध्वस्त करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे यावल वनविभाागाचे उपवनसंरक्षक जमीर एम.शेख म्हणाले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !