भाडेवाढीचा फटका : भुसावळ-जळगावसाठी 51 तर नाशिकसाठी 483 रुपये लागणार भाडे


Impact of fare hike: Rs 51 for Bhusawal-Jalgaon and Rs 483 for Nashik भुसावळ (27 जानेवारी 2025) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे शनिवार दि. 25 पासून एसटीची भाडे वाढ केली जात आहे. यामुळे शनिवारपासून प्रवाशांना एका तिकीटाच्या हल्लीच्या दरापेक्षा 15 टक्के जास्त रक्कम मोजावी लागणार आहे. यामुळे भुसावळ बसस्थानकावरून जळगावसाठी 51, यावलसाठी 36, रावेरसाठी 70, नाशिकसाठी 483, संभाजी नगरसाठी 292 रूपये मोजावे लागणार आहे. दरम्यान, रेल्वेच्या मेमु, एक्स्प्रेस गाड्यांचे जनरल तिकीटाचे दर महामंडळाच्या बसच्या तिकीटापेक्षा अनेक पटीने कमी आहे. यामुळे रेल्वेला प्रवाशांची भविष्यात अधीक गर्दी होत जाईल,

भाडेवाडीने प्रवाशांच्या खिशाला कात्री
राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे शनिवारपासून एसटी तिकीटात भाडेवाढ करण्यात आली आहे. यामुळे प्रवाशांच्या खिश्याला आता कात्री लागणार आहे, महामंडळातर्फे भाडेवाढ ही हल्लीच्या तिकीटापेक्षा 15 टक्के अधीक वाढ केली आहे. यामुळे प्रवाशांना आर्थिक फटका बसणार आहे. विशेष करून निम्मे तिकीट दर असलेल्या लाडक्या बहीणींना एसटीच्या दरात 50 टक्के सवलत आहे. मात्र, त्यांना सुध्दाआता भाडेवाढीचा फटका बसणार आहे. निम्मे दरात फिरणार्‍या ज्येष्ठ नागरिकांना सुध्दा याचा आर्थिक फटका बसणार आहे. महामंडळातर्फे भाडेवाढीची घोषणा करण्यात आली असून त्याची अंमलबजावणी ही शनिवारपासून सुरू झाली आहे.


महिला प्रवाशांनाही भाडेवाढ
महामंडळाने केलेल्या भाडेवाढीचा फटका हा लाडक्या बहिणींना सुध्दा बसणार आहे, निम्मे तिकीट दर असले तरी त्यांना आता वाढीव दराप्रमाणे निम्मे दराने पैसे मोजावे लागणार आहे, महामंडळाने केलेल्या भाडेवाढीमुळे त्याच प्रमाणे प्रवाशांना महामंडळाकडून सुविधा मिळाव्यात, जेणे करून बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, अद्यावत बसस्थानक, स्वच्छ मुतारी, शौचालये असावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बसेस सुध्दा सुस्थितीत असाव्यात.

मशीनमध्ये नवीन दर फिक्स
महामंडळाने केलेल्या भाडेवाढीचे नवीन दर वाहकाकडे असलेल्या तिकीट देण्याच्या मशीनमध्ये फिक्स करण्याचे काम करण्यात आले आहे, यामुळे प्रत्येक तिकीटामागे आता 15 टक्के भाडेवाढ राहणार आहे, याबाबत सर्व वाहकांना सूचित करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !