जोंधनखेड्यात प्राथमिक उप आरोग्य केंद्राचे लोकार्पण
नागरिकांना शासकीय रुग्ण सेवा मिळण्यास मदत : आमदार चंद्रकांत पाटील
कुर्हाकाकोडा (28 जानेवारी 2025) : सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या मुक्ताईनगर तालुक्यातील जोंधनखेडा येथे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते उप आरोग्य केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. गावातच शासकीय रुग्ण सेवेचा लाभ मिळणार असल्याचे यावेळी आमदार चंद्रकांत पाटील म्हणाले.
सव्वा कोटी खर्चातून उपआरोग्य केंद्र
आमदार चंद्रकांत पाटील यांनी जोंधनखेडा आदिवासी गावामध्ये आदिवासी फंडातून एक कोटी 25 लाख रुपयांचे उपआरोग्य केंद्र मंजूर केले होते.या उपकेंद्राचे काम पूर्ण झाल्याने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून आमदार चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी आमदार पाटील यांनी आदिवासी भागात प्राथमिक उपकेंद्र सुरू झाल्याने गोरगरीब नागरिकांना शासकीय रुग्ण सेवेचा लाभ मिळण्यास मदत होणार असल्याचे सांगितले तसेच त्यांनी यावेळी शासकीय रुग्णवाहिका देण्याचे आश्वासन दिले.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमप्रसंगी भारतीय जनता पार्टी विधान सभाप्रमुख अशोक कांडेलकर विनोद पाटील, भाजपा तालुका सरचिटणीस, भाजपा तालुकाध्यक्ष प्रफुल्ल जवरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गोपाळराव पाटील, शिवसेना तालुकाध्यक्ष नवनीत पाटील यांच्यासह सर्व शिवसेना, भाजपा व राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कुर्हा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिन उत्साहात
शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या पटांगणावर शाळेचे कर्मचारी, विद्यार्थी व गावकरी यांची उपस्थिती होती. यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रशीद हुसेन तडवी यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक गायकवाड, स्त्री अध्यक्षिका योगीता गादे, क्रीडा शिक्षक बाळासाहेब त्रीभूवन यांनी विद्यार्थ्यांचे कवायत करून प्रदर्शन केले.
