जळगावात देहविक्रय करताना पकडलेली बांग्लादेशी तरुणी आशादीप वस्तीगृहातून पसार


जळगाव (28 जानेवारी 2025) : हॉटेलमध्ये देहव्यापार करताना पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात बांग्लादेशी तरुणीला पकडल्यानंतर तिला आशादीप वस्तीगृहात हलवण्यात आले होते मात्र ही तरुणी पसार झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय घडले जळगावात
एमआयडीसी पोलीस ठाण्यात पीटा कायद्यांतर्गत अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक अधिनियमनुसार गुन्हा दाखल होता. या प्रकरणात पोलीसांनी 19 वर्षीय बांग्लादेशातील तरुणीला ताब्यात घेवून तिला शासकीय आशादीप महिलांचे वसतीगृहाच्या ताब्यात दिले. शनिवार, 25 जानेवारी रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास पीडीत तरूणीने वसतीगृहातील बाथरूमच्या बाजूच्या भिंतीवरून उडी घेत पळ काढला.


ही घटना उघडकीला आल्यानंतर शहर पोलिसांना माहिती देण्यात आली. वसतीगृहाचे परिविक्षा अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रविवारी मध्यरात्री दोन वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्याणी वर्मा करीत आहेत.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !