यावल तालुक्यात दुचाकी अपघातात पूत्राचा मृत्यू : पिता गंभीर जखमी


Son dies in bike accident in Yaval taluka: Father seriously injured यावल (29 जानेवारी 2025) : यावल तालुक्यातील सावखेडा ते गायरान या रस्त्यावर चुंचाळे गावाच्या शिवारात दुचाकी घसरून अपघात झाला. या अपघातात पिता-पुत्र जखमी झाले असता दहा वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 26 डिसेंबर रोजी ही घटना घडली होती. अपघातातील जखमी बालकावर जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले नेमके
सावखेडा-गायरान रस्त्यावर चुंचाळे गावाच्या शिवारातून मोटरसायकलद्वारे राकेश भरतसिंग बारेला (30) व त्यांचा मुलगा युसूफ राकेश बारेला (10) हे दोघे जात असताना त्यांची मोटरसायकल घसरली आणि अपघात घडला. यामध्ये राकेश बारेला व युसूफ बारेला हे दोघे गंभीर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले. यावल ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर प्रथमोपचार करून बालकाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले.


जळगाव रुग्णालयात उपचारादरम्यान या दहा वर्षीय बालक राकेश याचा मृत्यू झाला. याप्रकरणी यावल पोलिसात हवालदार सुनील पाटील यांच्या फिर्यादीवरून राकेश बारेलाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे करित आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !