शिरसाड शेत शिवारात पाय घसरून विहिरीत पडल्याने प्रौढाचा मृत्यू
An adult died after slipping and falling into a well in the Shirsad farm यावल (29 जानेवारी 2025) : यावल तालुक्यातील साकळी या गावात 55 वर्षीय इसमाचा शिरसाड शेत शिवारात विहिरीत तोल जाऊन पडल्याने मृत्यू झाला. ही घटना 27 जानेवारी रोजी रात्री घडली. यावल ग्रामीण रुग्णालयात मृतदेह आणल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले. तयाप्रकरणी यावल पोलिसात मंगळवारी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दिलीप सुकलाल मराठे (55) असे मयताचे नाव आहे.
मराठे हे शिरसाड शिवारातील एका शेतातील विहिरीजवळ गेले असता त्यांचा पाय घसरला आणि ते विहिरीत कोसळले. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर तातडीने ग्रामस्थांनी धाव घेतली व रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेतल्यानंतर तीन वाजता शोध मोहिमेला यश आले व मराठे यांना यावल ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर तपासणी करून मृत घोषित करण्यात आले.
घटनास्थळावर मृतदेह काढण्यासाठी पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अर्जुन सोनवणे, हवालदार मोहसीन खान हे पथकासह दाखल झाले होते. मृतदेहाचे यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी प्रशांत जावळे यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह कुटुंबाला सोपवला. हा याप्रकरणी यावल पोलिसात निलेश एकनाथ मराठे यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली मोहसीन खान करीत आहे.







