बामणोद-फैजपूर रस्त्यावर पिकअप वाहनातून गोवंशाची वाहतूक रोखली : सहाय्यक पोलीस अधीक्षकांची कारवाई


Transportation of cattle in pickup vehicles stopped on Bamanod-Faizpur road: Action taken by Assistant Superintendent of Police यावल (29 जानेवारी 2025) : यावल तालुक्यातील बामणोद ते फैजपूर रस्त्यावरून विना परवानगी सहा गोवंश एका बोलेरो पिकअप वाहनातून नेले जात असताना सहायक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांना माहिती कळताच त्यांनी पथकाला निर्देश दिले. गोवंश आणि वाहन मिळून सात लाख 60 हजारांचा मुद्देमाल त्यांनी जप्त केला. फैजपूर पोलिसात अज्ञात चालक व वाहन मालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला

असे आहे नेमके प्रकरण
बामणोद-फैजपूर रस्त्यावर बोलेरो पिकप वाहन (क्रमांक एम. एच. 39 सी. 7305) मध्ये कत्तलीच्या उद्देशातून सहा गोवंश वाहतूक केले जात असताना सहा.अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांनी सहा.पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांना सूचना केल्या. वाहनाचा पाठलाग पोलीस करीत असताना वाहन चालकाने गुंगारा देण्याचा प्रयत्न केला मात्र यश आले नाही. पोलिसांचे वाहन आपल्या वाहना जवळ येताचे पाहून वाहन सोडून वाहनावरील चालक आणि मालक पसार झाले. पोलिसांनी वाहनासह गोवंश मिळून सात लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक रशीद तडवी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद गाभणे करीत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !