जळगावातील शक्ती फाऊंडेशनतर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध उपक्रम
जळगाव (29 जानेवारी 2025) : जळगावातील विवेकानंद नगरातील शक्ती फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष भारती जि.रंधे यांच्यातर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रामुख्याने संविधान गौरव अभियान अंतर्गत सामूहिक संविधान उद्घोषिका वाचन तसेच महिलांसाठी विविध स्पर्धा घेऊन भेट वस्तू देण्यात आले.
यांची होती उपस्थिती
प्रमुख अतिथी म्हणून आपल्या जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे, माजी महापौर तथा सभागृहाचे नेते ललित कोल्हे, दर्जी फाऊंडेशनचे गोपाल दर्जी, प्रभागाच्या माजी नगरसेविका सिंधू कोल्हे, महापौर सीमा भोळे, शिवसेना महिला जिल्हाप्रमुख सरिता माळी-कोल्हे, ज्योती गोपाल दर्जी, माजी नगरसेविका लीना पवार, योगीता पाचपांडे, शिवसेनेच्या शोभा चौधरी, निशा पवार, ममता जनजाळे व सुषमा चौधरी आदी उपस्थित होत्या.

उद्घाटन ललित कोल्हे यांनी केले. आमदार राजुमामा भोळे यांनी संविधानाप्रति आपले कर्तव्य व संविधानाचे वैशिष्ट्य सांगितले. ललित कोल्हे, गोपाळ दर्जी तसेच सरिता कोल्हे यांनी मनोगत व्यक्त केले. गोपाल दर्जी यांनी संविधान उद्देशिकेचे वाचन केले. कार्यक्रमानंतर परिसरातील महिलांना हळदी कुंकू देत वाण देण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन शक्ती फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्षा भारती रंधे यांनी केले. कार्यक्रमासाठी विवेकानंद नगर परिसरातील मिलिंद चौधरी, गजानन नाना पाटील, अशोक पाटील, प्रमोद पाटील, विलास सुतार, सतीश राजपूत, योगेश पाठक, धीरज चौधरी, प्रकाश सोनावणे, किरण दादा, मोनू दादा, सोपान पाटील, अॅड.अभिजीत रंधे, आकाश भंगाळे, मोहित सावडेकर, मयूर देशमुख, प्रियांका नारखेडे, सुनंदा सुतार, नेहा तळेले, प्रियांका रंधे, लक्ष्मी बोराडे, मृणालिनी रंधे यांनी परिश्रम घेतले.

