सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या ; धनंजय मुंडे यांनी नैतीकतेच्या मुद्यावर राजीनामा द्यावा
Supriya Sule clearly said; Dhananjay Munde should resign on the issue of morality मुंबई (28 जानेवारी 2025) : राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी परळी प्रकरणानंतर धनंजय मुंडे यांच्यावर टीकास्त्र सोडत त्यांनी नैतीकतेच्या मुद्यावर राजीनाम्याची मागणी केली. येथे चॅनलवर रोज एक नवीन पुरावा येत असताना आणखी काय पुरावे पाहिजेत? असा सवालही सुप्रिया सुळे यांनी पत्रपरिषदेत केला.
ऐकीव बातम्यांवर या नेत्यांना अटक मग तोच मुंडेंना का नाही
अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिक आणि छगन भुजबळ या सर्वांना ऐकीव बातम्यांवर अटक झाली व ते जेलमध्येही गेले मात्र येथे तर बीड प्रकरणात कागदपत्रे आहेत, पुरावे आहेत मग कारवाई का नाही? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारत आम्ही विरोधात आहोत, आम्हाला बाजूला ठेवा. पण, सत्तेतील तिनही पक्षाचे आमदार यावर बोलत आहेत, असेही ते म्हणाले.

अजित पवार हे धनंजय मुंडेंना वाचवत आहेत का? असा सवाल पत्रकारांनी केला असता, तुमच्या प्रश्नातच माझे उत्तर आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यांच्या प्रतिक्रियेवरून अजित पवार धनंजय मुंडेंना वाचवत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
क्षीरसागरांची चौकशी करा, आम्हाला अडचण नाही
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे याचा घातपात झाला असेल, अशी शंका आमदार संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केली होती. तर संदीप क्षीरसागर यांना त्याबाबत एवढी माहिती कशी, यावरून त्यांची चौकशी करायला पाहिजे, असे धनंजय मुंडे म्हणाले होते. यावरही सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली. संदीप क्षीरसागर यांची चौकशी केल्यास आम्हाला काही अडचण नाही. आम्ही फकीर आहोत, कोणत्याही चौकशीला तयार आहोत. आम्ही चुकीचे काम करत नाही.
