भुसावळातील डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांच्या ‘पोलीस पॅटर्न’ची आता नाशिक परिक्षेत्रात अंमलबजावणी

विशेष महानिरीक्षकांची बैठक : 51 पोलीस उपअधीक्षकांनी केला अभ्यास


गणेश वाघ

Bhusawal DYSP Krishnat Pingle’s ‘Police Pattern’ is now being implemented in Nashik area भुसावळ (30 जानेवारी 2025)  : भुसावळचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी 17 महिन्यांपूर्वी भुसावळ विभागाचा पदभार घेतल्यानंतर विविध उपक्रम राबवले. कर्मचार्‍यांचे मनोबल उंचावण्यासाठी ‘एम्प्लाई ऑफ द मंथ पुरस्कार’, पेंडींग अर्जासह गुन्हे निकाली काढण्यासाठी राबवलेली पद्धत, मुद्देमाल निर्गतीकरण, पोलिसिंग यासह प्रत्येक फाईल अपडेट ठेवण्याचा राबवलेला ‘भुसावळ पोलीस पॅटर्न’ आता नाशिक परिक्षेत्रात राबवला जाणार आहे. भुसावळकरांसाठी ही बाब निश्चितच कौतुकास्पद व अभिमानास्पद आहे. भुसावळ भेटीवर आलेल्या नाशिक परिक्षेत्राचे महानिरीक्षक दत्तात्रय कराळे यांनी पिंगळे यांच्या कार्याचे कौतुक केले शिवाय परिक्षेत्रातील 51 पोलीस उपअधीक्षकांना संबोधीत करीत हा पॅटर्न आपल्या विभागातही राबवण्याच्या सूचना केल्या.

51 पोलीस अधीक्षकांची भुसावळात हजेरी
नाशिक परिक्षेत्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, नगर या पाच जिल्ह्यातील सुमारे 51 डीवायएसपी बुधवारी भुसावळात आले. यावेळी डीवायएसपी कार्यालयातील मिटींग हॉलमध्ये झालेल्या बैठकीला विशेष महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते यांची उपस्थिती होती.

प्रत्येक कर्मचार्‍यांमध्ये उत्साह वाढवा
भुसावळ विभागातील पोलीस ठाण्याचे काम कसे अद्यावत ठेवण्यात आले आहे शिवाय प्रत्येक फाईलींग कसे अपडेट आहे, याची पाहणी करून त्यांनी वरिष्ठ अर्ज निकाली काढण्यासाठी कसे प्रयत्न केले, कश्या योजना आखल्यात, प्रत्येक महिन्याला प्रत्येक पोलीस ठाण्याच्या उत्कृष्ठ काम करणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांना प्रमाणपत्र देऊन गौरविले जाते. असेच चांगले उपक्रम आपल्या कार्यक्षेत्रात राबवावे आणि प्रत्येक कर्मचार्‍यांमध्ये उत्साह वाढवावा, असे प्रतिपादन दत्तात्रय कराळे यांनी केले. यावेळी डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांनी त्यांनी केलेल्या कामाची पध्दत आणि गुन्हे निर्गतिकरणाची माहिती दिली. पाचही जिल्ह्यातून आलेल्या डीवायएसपी यांनी बाजारपेठ पोलीस ठाण्याला भेट देत पाहणी करीत राबवलेल्या उपक्रमांचे फोटोही कॅमेर्‍यात टीपले.

पोलिसांच्या गाड्याचा गराडा
डीवायएसपी कार्यालयातून बाजारपेठ पोलीस ठाण्याची पहाणी करण्यासाठी सुमारे 40 पेक्षा जास्त गाड्यांमध्ये डीवायएसपी आल्याने नेमके काय झाले आहे, इतके अधिकारी कश्यासाठी आले, याची उत्सुकता येणार्‍या जाणार्‍यांमध्ये होती. अपर अधीक्षक नखाते यांनी अधिकार्‍यांना विविध माहिती दिली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !