सामान्य जनतेचे संधीचा लाभ घ्यावा : गौपाल चैतन्यजी महाराज


पाल (31 जानेवारी 2025) : आमदार अमोल जावळे हे हरिभाऊंच्या जनसेवेचा वारसा पुढे नेत असून सामान्य जनतेचे संधीचा लाभ घ्यावा तसेच एक सुसंस्कृत आमदार लाभल्याने परिसराला एक सामाजिक व राजकीय ऊर्जा मिळाली, असे प्रतिपादन मंगळवारी पाल लक्ष्मण चैतन्य बापूजी आश्रमाचे पदस्थ तथा महाराष्ट्र प्रदेश संत समितीचे अध्यक्ष श्रद्धेय संत श्री गोपाल चैतन्यजी महाराज यांनी केले. तीर्थक्षेत्र पाल येथे आमदार अमोल जावळे यांच्या संकल्पनेतून शासन आपल्या दारी शिबिरात ते बोलत होते. प्रसंगी जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड, संजय गांधी निराधार योजनेच्या तसेच कृषी विभाग योजना यांचे फॉर्म भरून घेण्यात आले. येत्या पंधरा दिवसात लोकांना कार्ड व प्रमाणपत्र वाटप करण्याच्या सूचनाही आमदार जावळेंनी केल्या.

जनतेच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही
आमदार जावळे म्हणाले की, विधानसभा क्षेत्रातील ग्रामीण जनतेच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय हाती घेऊन सामान्य जनतेच्या सेवेसाठी आपण कायम कटिबद्ध राहू तसेच जनतेचे मला पक्षाला जे प्रेम आणि विश्वास दिला त्याला किंचितही तडा जाऊ देणार नाही.


यांची होती उपस्थिती
यावेळी भाजपा ज्येष्ठ नेते सुरेश धनके. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गोमती बारेला, माजी सरपंच अर्जुन जाधव, रघुनाथ चव्हाण, नरसिंग पवार, वासू नरवाडे, धनलाल पवार, सुरेश पवार, नंदकिशोर चव्हाण, प्रदीप जाधव उपस्थित होते. प्रास्ताविक विनय पवार तर सूत्रसंचालन गणेश चव्हाण यांनी केले. यशस्वीतेसाठी जी.आर.साळी, नायब तहसीलदार विवेक शिरेकर, पुरवठा निरीक्षण अधिकारी निलेश धांडे, मंडळाधिकारी सलीम तडवी, ग्रामसेवक सुनील सुवर्णे, अमित तडवी, दस्तगीर तडवी, आमीन तडवी, कोतवाल प्रेमसिंग पवार, सेतू चालक संजय पवार, मनीष बाविस्कर तसेच भाजपा युवा मोर्चा कार्यकर्ते मगन पवार, सुरज सराटे, राहुल चव्हाण, सुमित राठोड, राजन चव्हाण, कृष्णा पवार आदींनी परिश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !