वाळू माफियांमध्ये खळबळ : रीगाव-सुळे शिवारात अवैध रेती वाहतूक करणारे तीन ट्रॅक्टर जप्त
कुर्हाकाकोडा (31 जानेवारी 2025) : रिगाव-सुळे-वढोदा रस्त्याने अवैध रेती वाहतूक करणार्या तीन ट्रॅक्टरवर तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने कारवाई केल्याने अवैध वाळू वाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली.
वर्षा ईश्वर भोंगरे (निमखेडी बु.॥) यांचे एक तर गणेश रमेश बेलदार (रिगाव) यांचे दोन ट्रॅक्टर असल्याचे सांगण्यात आले. तहसीलदार गिरीश वखारे यांच्या मार्गदर्शनाखाली तलाठी काळे, खैरनार, बोराटकर, सोनवणे, अमित इंगळे, वैभव काकडे, तहसील कार्यालयातील कर्मचारी महसूल सहायक प्रशांत सावकारे, किरण बावस्कर आदींनी ही कारवाई केली. ट्रॅक्टर जप्त केल्यानंतर मुक्ताईनगर पोलीस स्टेशनच्या कुर्हा दूरक्षेत्राच्या आवारात लावण्यात आले. सहा.पोलीस उपनिरीक्षक चौधरी व सहकार्यांनी ही कारवाई केली. ट्रॅक्टर मालकाला प्रत्येकी एक लाख बारा हजारांचा दंड करण्यात आल्याचे सांगण्यात आले.







