जळगावात विटा वाहून नेणारी क्रेन पाचव्या मजल्यावरून जमिनीवर कोसळताच तरुण मजुराचा मृत्यू


A young laborer died when a crane carrying bricks fell from the fifth floor in Jalgaon जळगाव (31 जानेवारी 2025) : विटा भरलेला क्रेन पाचव्या मजल्यावर जात असताना ती अडकली आणि वेगाने खाली कोसळली. ही क्रेन डोक्यावर पडल्याने कामगाराचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना गुरुवार, 30 रोजी दुपारी 4.15 वाजेपूर्वी खोटेनगर परिसरात मटन हॉटेलच्या नियोजित सात मजली इमारतीच्या कामावर घडली. मुनेश देवसिंग बोर्डे (30, हमु रायसोनीनगर) असे मृत कामगाराचे नाव आहे.

काय घडले नेमके
मुनेश बोर्डे हा मूळ देवली, ता.वरला, जि.बडवानी, म.प्र.) येथील रहिवासी असून कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तो पत्नी, तीन वर्षाची मुलगी तसेच एक वर्षाचा मुलगा अशांसह मोहाडी रोडवरील रायसोनीनगरात वास्तव्य करत होता. त्याचा भाऊ दिनेश दरबार बोर्डे (पावरा) हा एरंडोल येथे कुटुंबासह वास्तव्य करतो. इमारतीच्या बांधकामासाठी त्यालाही जळगाव येथे मुनेश याने बोलवून घेतले होते. हे दोघे भाऊ एकाच साईटवर काम करत होते.
दिनेश बोर्डे याच्या माहितीनुसार, खोटेनगर परिसरातील मटण हॉटेलच्या बाजुला सात मजली प्रशस्त इमारतीचे बांधकाम सुरू आहे. याठिकाणी आज दुपारी क्रेनव्दारे खालुन विटा भरुन पाचव्या मजल्यावर पोहोचविण्याचे काम सुरु होते.


मुनेश हा खालुन विटा क्रेनमध्ये भरुन देत होता तर दिनेश बोर्डे व इतर कामगार पाचव्या मजल्यावर क्रेनमधुन विटा उतरविण्याचे काम करत होते.

आवाज दिला … काळाने साधला डाव
भरलेली क्रेन वरती येत असताना पाचव्या मजल्याजवळ अचानक अडकली. त्यानंतर ती वेगाने खाली जात होती. हा प्रकार लक्षात येताच दिनेश याने त्याचा भाऊ मुनेश याला बाजुला हो,असा आवाज देत सावध करण्याचा प्रयत्न केला मात्र तोवर खाली विटांजवळ उभा असलेल्या मुनेश याच्या डोक्यावर क्रेन आदळली आणि मुनेश कोसळुन रक्ताच्या थारोळ्यात पडला. मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतल्याने गर्दी झाली.

जळगाव तालुका पोलीस ठाण्याचे हवालदार अनिल फेगडे यांच्यासह सहकारी घटनास्थळी दाखल झाले. रुग्णवाहिका मागवून त्यांनी बेशुध्दवस्थेतील मुनेश याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविले. तपासणीअंती वैद्यकीय अधिकार्‍यांनी मुनेश याला मृत घोषीत केले. डोक्यावरच क्रेन पडल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला, असे सुत्रांकडून सांगण्यात आले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !