भुसावळातील के.नारखेडे विद्यालयाचे एक दिवसीय स्काऊट गाईड शिबिर


भुसावळ (31 जानेवारी 2025) : शहरातील के.नारखेडे विद्यालयाचे एक दिवसी स्काऊट गाईड शिबिर कष्टभंजन हनुमान मंदिर, सुना सावखेडा (बामणोद) या ठिकाणी झाले. याप्रसंगी विद्यालयातील एकूण 76 स्काऊट-गाईड यांनी शिबिरात सहभाग घेतला.

दिवसभरात गाणी, खेळ, निसर्ग भ्रमंती, स्वच्छता, स्काऊट-गाईड चळवळीचा इतिहास, स्काऊट गाईडचे संस्थापक लॉर्ड बेडन पॉवेल यांचा जीवनपट, हाईक, स्काऊट गाईडचे नियम, ध्येय वचन या संदर्भातील महत्व व गांभीर्य विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. शेकोटीवर विद्यार्थ्यांनी विभिन्न सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विद्यालयाचे प्रभारी मुख्याध्यापक वाय.एन.झोपे व उपशिक्षक एस.पी.पाठक यांनी शिबिरालाभेट देऊन मार्गदर्शन केले.


याप्रसंगी उत्कृष्ट संघ कोपरा सजावटीसाठी व शेकोटी कार्यक्रमात उत्कृष्ट सादरीकरण केल्याबद्दल विद्यार्थ्यांना यथोचित पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. शिबिरास स्काऊट मास्टर एस.एम.चिपळूणकर एस.पी.महाजन, नवीन नेमाडे, गाईड कॅप्टन कांचन राणे, शुभांगी पाटील, नेहा पाटील, स्वाती इखे यांनी परिश्रम घेतले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !