प्रवाशांनो लक्ष द्या : उद्या पाचोर्यात ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक ; चार रेल्वे गाड्या रद्द
Attention passengers : Traffic and power block in Pachora today ; Four trains cancelled भुसावळ (31 जानेवारी 2025) : भुसावळ विभागातील पाचोरा येथे यार्ड रीमॉडेलिंगच्या कार्यानिमित्त प्री-नॉन इंटरलॉकिंग (फेज दोन) आणि नॉन इंटरलॉकिंग कार्यासाठी शनिवार, 1 फेब्रुवारी ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामांमुळे चार रेल्वे गाड्या रद्द करण्यात येणार आहे.
आज या रेल्वे गाड्या रद्द
शनिवार, 1 फेब्रुवारी रोजी गाडी क्रमांक 01211 बडनेरा-नाशिक एक्सप्रेस, गाडी क्रमांक 01212 नाशिक-बडनेरा एक्सप्रेस, गाडी क्रमांक 11113 देवळाली-भुसावळ एक्सप्रेस, गाडी क्रमांक 11114 भुसावळ-देवळाली एक्सप्रेस रद्द करण्यात आली तर मंगळवार, 4 फेब्रुवारी रोजी गाडी क्रमांक 01211 बडनेरा-नाशिक एक्सप्रेस, गाडी क्रमांक 01212 नाशिक-बडनेरा एक्सप्रेस, गाडी क्रमांक 11113 देवळाली-भुसावळ एक्सप्रेस, गाडी क्रमांक 11114 भुसावळ-देवळाली एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे.

या गाड्या उशिराने धावणार
मंगळवार, 4 फेब्रुवारी रोजी 12859 मुंबई-हावडा गीतांजली एक्सप्रेस मुंबई येथून दोन तास उशिराने सुटेल तर 22129 लोकमान्य टिळक टर्मिनस- अयोध्या कँट एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दोन तास उशिराने सुटेल तर 15017 लोकमान्य टिळक टर्मिनस-गोरखपूर एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनस येथून एक तास उशिराने सुटणार आहे. पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी कामे आवश्यक असल्याने प्रवाशांनी या कालावधीत होणार्या गैरसोयीबद्दल सहकार्य करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.






