नंदुरबार गुन्हे शाखेची धडक कारवाई : नंदुरबारसह नवापूरातील अवैध गॅस रिफिलिंग सेंटरमधून 37 सिलिंडर जप्त
तीन लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त ः सहा संशयीतांविरोधात गुन्हा दाखल ः कारवाईने उडाली खळबळ

Nandurbar Crime Branch takes drastic action : 37 cylinders seized from illegal gas refilling centers in Nandurbar and Navapur नंदुरबार (31 जानेवारी 2025) : नंदुरबार गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे नंदुरबार शहरासह नवापूरात सुरू असलेल्या अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर छापा टाकत 37 सिलेंडरसह सात इलेक्ट्रीक मोटर, चार वजन काटे मिळून तीन लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईने वाहनांमध्ये अवैधरित्या गॅस रिफिलिंग करणार्यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. सहा संशयीतांविरोधात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
गोपनीय माहितीवरून कारवाई
नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना नंदुरबार शहरातील गाझी नगर परिसर, भोणे फाटा परिसर, पटेलवाडी परिसर तसेच नवापूर येथील सरकार चौक परिसरात काही इसम हे विना परवाना घरगुती वापराचे गॅस सिलेंडरमधील गॅस हा मोटारीचे सहाय्याने वाहनांमध्ये भरून व्यवसाय करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी पथकाला निर्देश दिल्यानंतर पथकाने एकाचवेळी दोन्ही शहरांमध्ये छापेमारी करीत कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.
या संशयीतांविरोधात गुन्हा
नंदुरबारच्या गाझी नगर परिसरात अफसरोद्दीन नवाजोद्दीन काझी (27, नंदुरबार), भोणे फाटा परिसरात दिनेश लोटन चौधरी (50, रा.भाट गल्ली, शनी मंदीराजवळ, नंदुरबार, ह.मु.गांधी नगर), पटेलवाडी परिसरात आसीफ दादाभाई पिंजारी (39, ह.मु.बी.सी.हॉस्टेलसमोर, पटेलवाडी, नंदुरबार), पटेलवाडी परिसरात फयाज सईद कुरेशी (19, रा.मंगळ बाजार, नंदुरबार), आमीन वाहीद पिंजारी (पटेलवाडी, नंदुरबार) तसेच नवापूरच्या सरदार चौक परिसरात जुनेद फारुक काथावाला (सरदार चौक, श्रीकृष्ण मंदीर समोर, नवापूर) याच्याविरोधात कारवाई करण्यात आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त.एस, अपर पोलीस अधीक्षक आशीत कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, हवालदार मुकेश तावडे, मनोज नाईक, सजन वाघ, राकेश वसावे, महेंद्र नगराळे, जितेंद्र तोरवणे, विशाल नागरे, दादाभाई मासूळ, राकेश मोरे, मोहन ढमढेरे, अविनाश चव्हाण, अभय राजपूत, राजेंद्र काटके, यशोदीप ओगले, रामेश्वर चव्हाण, आनंदा मराठे आदींच्या पथकाने केली.