भुसावळातील स्टार लॉनजवळून दुचाकी लांबवली
भुसावळ (1 फेब्रुवारी 2025) : शहरातील स्टार लॉनजवळूून चोरट्यांनी 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. ही घटना 28 रोजी रात्री आठ वाजता घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
आशा सुनील भटकर (38, ऑईल मिलजवळ, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, मंगळवार, 28 रोजी रात्री आठ वाजता दुचाकी (एम.एच.19 बीई 7490) लावली असता चोरट्यांनी संधी साधली. तपास हवालदार विजय नेरकर करीत आहेत.







