सापुतारा घाटात बस कोसळली : पाच भाविक जागीच ठार


Bus falls into Saputara ghat: Five devotees die on the spot नाशिक (2 फेब्रुवारी 2025) : महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वरहून गुजरातच्या द्वारका येथे 48 भाविकांना घेऊन जाणारी 48 भाविकांची बस सापुतारा घाटात कोसळल्याने पाच भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. मयत भाविक हे मध्य प्रदेशातील गुना, शिवपुरी आणि अशोक नगर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले.

काय घडले प्रवाशांसोबत
मध्यप्रदेशातील काही भाविक खाजगी बसने देवदर्शनासाठी नाशिकला आले होते. दर्शनानंतर ते सुरतच्या दिशेने जात असताना, रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास सापुतारा घाटातील एका वळणावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे बस तब्बल 200 फूट खोल दरीत कोसळली.



अपघाताचा मोठा आवाज झाल्याने गावकरी तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बचावकार्य राबवत जखमींना बाहेर काढले आणि तातडीने रुग्णालयात हलवले. पोलिसांनीही त्वरित घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट
या भीषण अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. बस चालकाचे नियंत्रण का सुटले, बसचा वेग किती होता, घाटातील वळण धोकादायक होते का, याबाबत पोलीस तपास सुरू आहे.

या दुर्घटनेमुळे भाविकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांचा ओळख पटवण्याचे काम सुरू असून त्यांच्या कुटुंबीयांना संपर्क केला जात आहे. अपघातातील जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. पोलीस अधिक तपास करत असून प्रशासनाकडून मदत कार्य वेगाने सुरू आहे.

 









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !