कॅन्सरवरील औषध किंमत कमी करणारा अर्थसंकल्प : प्रा.डॉ.सुनील नेवे


भुसावळ (2 फेब्रुवारी 2025) : मोफत वाटप होणार्‍या औषधांवरील कस्टम ड्युटी हटवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. याशिवाय कॅन्सरच्या औषधांवरील कस्टम ड्युटी हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. कॅन्सरशिवाय महत्त्वाची 36 औषधं स्वस्त होणार, याशिवाय लिथियम आयन बॅटरी बनवणार्‍यांना दिलासा देण्यात आलाय. ही महत्वाची बाब वाटते, असे प्रा.सुनील नेवे म्हणाले.

महाराष्ट्र हे शिक्षण, उच्च आणि तंत्रशिक्षणाच्या क्षेत्रात अग्रेसर राज्य आहे. सरकारी शाळांमध्ये 5 लाख अटल टिंकरिंग लॅब स्थापन करणे, शाळा आणि आरोग्य केंद्रांना ब्रॉडबँड सेवा पुरवणे, भारतीय भाषांमध्ये पुस्तके उपलब्ध करुन देणे, आयआयटीमधील तसेच मेडिकल कॉलेजमधील विद्यार्थीसंख्या आणि सुविधा वाढवण्याचा फायदा राज्यातील युवकांना निश्चितपणे होईल.
न्यूक्लिअर एनर्जी मिशनच्या माध्यमातून 2047 पर्यंत 100 गिगावॅट ऊर्जानिर्मितीचं लक्ष्य देशाला महासत्तेकडे नेणारं महत्वाचं पाऊल आहे.असे वाटते.सरकारी कर्मचार्‍यांना आयकरातून थोडाफार लाभ होईल असे वाटते. फक्त अर्थसंकल्पात जे म्हटले आहे त्याची अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचेही प्रा.नेवे यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !