धुळे-साक्री-नवापूर महामार्गावरील वाहतूकीत बदल

Changes in traffic on Dhule-Sakri-Nawapur highway धुळे (2 फेब्रुवारी 2025) : रेल्वे क्रॉसिंग गेट क्र. 74 रेल्वे रुळाच्या पृष्ठ भागाच्या देखभालीच्या व सुधारणा करण्याच्या कामकाजाकरीता धुळे-साक्री-नवापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक 6 फेब्रूवारी 2025 पर्यंत धुळे-सोनगीर-दोंडाईचा-शहादा-अक्कलकुवा मार्ग वळविण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जारी केले आहेत.
6 पर्यंत वाहतुकीत बदल
सार्वजनिक हिताची तसेच कायदा व सुव्यवस्थेची बाब विचारात घेऊन 30 जानेवारी 2025 रोजी सकाळी आठ ते 6 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री आठ वाजेपर्यंत रेल्वे लेव्हल, क्रॉसिंग गेट क्रमांक 74, चिंचपाडा ते कोळदे, ता. नवापूर राष्ट्रीय महामार्गावरील मुख्य रहदारी रस्ताबंद करण्यात येत आहे. यामार्गावरील वाहतुक धुळे-सोनगीर-दोंडाईचा-शहादा-अक्कलकुवा मार्ग वळविण्यात येत आहे.
राष्ट्रीय महामार्गावरील धुळे-साक्री-नवापूर ही वाहतूक बंद करण्यात आलेली असून ती वरीलप्रमाणे वळविण्यात आली आहे. रेल्वे प्रशासनाच्या मदतीने उपप्रादेशिक परिवहन विभाग व पोलीस प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेण्यात येवून योग्य तो बंदोबस्त व बॅरेकेटीग करण्यात यावी. तसेच रेल्वे प्रशासनाने या रेल्वे रूळाचे व त्यावरील रस्त्याचे दुरूस्तीचे काम विहित मुदतीत पूर्ण करावे, असेही जिल्हाधिकारी पापळकर यांनी आदेशात नमूद केले आहे.