जळगाव तालुक्यातील विवाहिता दोन मुलांसह बेपत्ता


Married woman from Jalgaon taluka goes missing with two children जळगाव (2 फेब्रुवारी 2025) : खरेदीसाठी मॉलमध्ये जाते, असे कुटुंबियांना सांगून दोन मुलांना सोबत घेत शहरात आलेली महिला बेपत्ता झाली. कुटुंबियांनी तिचा सर्वत्र शोध घेतला असता तपास लागू शकला नाही. गुरुवार,31 रोजी दुपारी ही घटना घडली. या प्रकरणी तक्रारीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली.

32 वर्षीय महिला जळगाव तालुक्यातील एका गावात कुटुंबासह वास्तव्यास आहे. मॉलमध्ये वस्तू खरेदीसाठी जात आहे, असे कुटुंबियांना सांगून 11 वर्षीय दोन मुलांना सोबत घेत ही महिला घराबाहेर पडली. मात्र बराच उशिरापर्यत महिला घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी तिचा शोध घेतला.परंतु तपास लागला नाही. या प्रकरणी हवालदार किरण पाटील हे दाखल मिसिंगचा तपास करीत आहेत.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !