चाळीसगाव शहर पोलिसांची मोठी कामगिरी : तीन तलवारींसह पुण्यातील भावंडांना बेड्या


चाळीसगाव (2 फेब्रुवारी2025) : पाटणादेवी रोडवरील चौफुली बायपास जवळ पेट्रोलिंग करणार्‍या पोलीस पथकाने मोटारसायकलवरील दोघां संशयीत तरुणांकडून तीन स्टीलच्या तलवारी जप्त केल्या. ही कारवाई शुक्रवार, 31 रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास करण्यात आली. संशयित दोघे सख्खे भाऊ पुण्यातील रहिवासी असून हर्षल सुनील परदेशी (25) व जयेश सुनीलल परदेशी (22, रा.पांडुरंग हाईट्स, मांजरी फार्म, हडपसर, पुणे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

काय घडले चाळीसगावात
चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी रात्रीची पेट्रोलिंग करतं असतांना पाटणादेवी रोडवरील बायपास जवळ असणार्‍या दशा मा रसवंती जवळ मोटारसायकलवर दोघे बसलेल्या तरुणांवर पोलिसांचा संशय आला म्हणून पोलिसांनी त्यांना थांबवून त्यांची विचारपूस केली. त्यानंतर त्यांच्या जवळ असलेल्या बॅगेची तपासणी केली असता त्यात 80 सेमी लांबीची स्टीलची एक तलवार व 60 सेमी लांबीची स्टीलच्या दोन तलवारी अशा एकूण तीन तलवारी व मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली. पोलीस नाईक नितीन आगोणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.



पुण्यातील दोघे तरुण चाळीसगाव शहरात येवून तलवारी घेवून कुठे जात होते? यात त्यांचे आणखी साथीदार आहेत का ? याबाबत तपास पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !