भुसावळात स्व.बी.सी.बियाणी यांना स्मृतीदिनामित्त आदरांजली
Tributes paid to late B.C. Biyani on his death anniversary in Bhusawal भुसावळ (2 फेब्रुवारी 2025) : बियाणी प्रोडक्ट प्रायव्हेट लिमिटेडचे निर्माते स्व.बी.सी.बियाणी (मामाजी) यांच्या अकराव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना विविध स्तरातील मान्यवरांनी आदरांजली वाहिली. बियाणी मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी मामाजींच्या पुर्णाकृती पुतळ्यासमोर मानवंदना दिली.
स्व.बी.सी.बियाणी यांच्या पत्नी कांताबाई बियाणी यांनी पुतळ्याचे पूजन करून पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली वाहिली.

वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे व त्यांच्या पत्नी रजनी सावकारे, तसेच बियाणी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी, सचिव डॉ.संगीता बियाणी, विनोद बियाणी, स्मिता बियाणी, रोनक बियाणी, पियुष बियाणी, गोपाळ ठाकूर, राजेश पारीख, प्रवीण भराडिया, प्रा.सुनील नेवे, युवराज लोणारी, किरण कोलते, गिरीष महाजन, दीपक धांडे, अॅड.निर्मल दायमा, नीळकंठ भारंबे, महेंद्रसिंग ठाकूर, रमाकांत महाजन, अजय भोळे, व्यापारी असोसिएशनचे राधेशाम लाहोटी, प्राचार्य राहुल बारजिभे, अॅड.बोधराज चौधरी, निकी बत्रा, सतीश सपकाळे, दीपक भिरुड, मयुर नागोरी, गोविंद हेडा आदींनी उपस्थित राहून आदरांजली वाहिली.






