जळगावात संदल मिरवणुकीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न : त्रिकूटाविरोधात गुन्हा


जळगाव (2 फेब्रुवारी 2025) : हुरे मलंग बाबा उरूसाच्या निमित्ताने आयोजित संदल मिरवणुकीत आक्षेपार्ह क्लिप वाजवून दोन समाजात तेढ निर्माण केल्याचा प्रकार 23 जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता घडला होता. या प्रकरणी शनिवार, 1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता तिघांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

काय घडले जळगावात
हुरे मलंग बाबा उरूसाच्या निमित्ताने 23 जानेवारी रोजी रात्री तांबापूरा येथे संदल मिरवणूक निघाली. अशरफ शेख शकील (रा. तांबापूरा) यांनी या मिरवणुकीचे आयोजन केले. या मिरवणुकीदरम्यान योगेंद्र पाटील (रा.भुसावळ) यांच्या मालकीच्या जय चैतन्य नावाच्या डी.जे.वर आक्षेपार्ह क्लिप वाजविण्यात आली तसेच संशयीत आरोपी शेख मुजाहित शेख जाकीर यांनी आक्षेपार्ह फोटो मिरवणुकीत नाचून दोन समाजांत तेढ निर्माण होईल, असे कृत्य केले. त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा प्रकार घडला आहे.



या घटनेची गंभीर दखल घेत, शनिवार, 1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले करत आहेत.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !