महाराष्ट्र एक्स्प्रेसमधून महिलेचे 12 लाखांचे दागिने लांबवले : चाळीसगाव-जळगावदरम्यानची घटना


Woman’s jewellery worth Rs 12 lakhs stolen from Maharashtra Express: Incident between Chalisgaon-Jalgaon जळगाव (3 फेब्रुवारी 2025) : रेल्वे प्रवासातील चोर्‍या नवीन नाहीत मात्र चोरट्यांनी चक्क 12 लाखांचे दागिने लांबवल्याने या प्रकाराने खळबळ उडाली आहे. चोरीची ही घटना महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये घडल्यानंतर जळगाव लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय घडले प्रवासात
अमरावतीच्या संध्या चंद्रकांत राठी (69, रा.अमरावती) या पुण्यातील नातेवाईकांकडे आयोजित कार्यक्रमाहून बडनेरा येथे पती डॉ. चंद्रकांत राठी यांच्यासह महाराष्ट्र एक्स्प्रेसने परतीचा प्रवास करीत होत्या. 31 जानेवारी रोजी रात्री महाराष्ट्र एक्सप्रेसने बडनेरापर्यंत येण्यास निघाले. प्रवासामध्ये संध्या राठी यांनी सोबत असलेले तीन व दुसरी दोन तोळ्याच्या अशा सोन्याच्या दोन चैन, डायमंड मंगळसूत्र, कानातील आठ तोळ्याचे झुमके, पाच ग्रॅमचे टॉप्स व रोख 10 हजार रुपये एका बॉक्समध्ये ठेवून ते पर्समध्ये ठेवले. रात्री झोपल्या त्या वेळी त्यांनी ही पर्स बर्थवर स्वत:जवळच ठेवली. सकाळी सात वाजेच्या सुमारास पाचोरा स्थानकापूर्वी त्यांनी पर्स पाहिली असता त्यात रोकड व दागिने सापडले नाही. त्या वेळी त्यांनी आजूबाजूला शोध घेतला, मात्र ऐवज न सापडल्याने त्यांनी रेल्वेच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविली.



त्या वेळी तसा संदेश रेल्वे नियंत्रण कक्षातून लोहमार्ग पोलिसांना मिळताच जळगाव स्थानकावरील रेल्वे पोलिस चौकीचे हवालदार सचिन भावसार यांनी जळगाव स्थानकावर महाराष्ट्र एक्सप्रेस आल्यानंतर तक्रार नोंदवून घेतली. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

चोरट्यांनी पर्समधून रोख 10 हजार रोखसह 11 लाख 95 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्याने लांबविले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !