भुसावळात निळे निशाण संघटनेत अनेक महिलांचा प्रवेश


भुसावळ (3 फेब्रुवारी 2025) : शहरातील शासकीय विश्राम गृहात संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संघटनेच्या जिल्हाध्यक्षा नंदा भावटे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.

यांची होती उपस्थिती
यावेळी संघटनेचे जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष अ‍ॅड.प्रवीण इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष सदाशीव निकम, शिक्षण व रोजगार समिती जिल्हा प्रमुख निकिता भावटे यांच्या उपस्थितित महिला सक्षमीकरणा संदर्भात चर्चा करण्यात आली. भुसावळ शहरातील सुरेखा ठाकूर, ज्योती पवार, वंदना चव्हाण यांच्यासह अनेक महिलांनी संघटनेत प्रवेश केला. संघटनेच्या फैजपूर विभाग महिला आघाडी अध्यक्षा लक्ष्मी मेढे, फैजपूर विभाग अध्यक्ष विलास तायडे, खिरोदा सर्कल विभाग अध्यक्षा उज्वला वाघ, सुलोचना भालेराव, खानापूर सर्कल विभाग अध्यक्ष उदय वाघ, यावल तालुका नियोजन समिती अध्यक्ष अनिल तायडे, सागर तायडे यांनी संघटनेत प्रवेश करणार्‍या महिलांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.












मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !