भुसावळातील गो मातेची चोरी रोखण्यासह कत्तल थांबवावी

भुसावळ (3 फेब्रुवारी 2025) : शहरात गो मातेच्या चोर्या वाढल्या असून मोठ्या प्रमाणावर गायींची कत्तल सुरू आहे. या संदर्भात प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांना माजी नगरसेवक पिंटू ठाकूर व गो प्रेमींनी निवेदन देत कारवाईची मागणी केली. मध्यरात्रीच्या सुमारास तस्कर इंजेक्शन देवून गोमातेची वाहनातून तस्करी करीत असून या प्रकारांना आळा घालण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी गोभक्त व माजी नगरसेवक पिंटू ठाकुर, सोनु अग्रवाल, राजु इंगळे, रोहित महाले, बल्लु धायडे, तेजस रणधीर, साहिल पाटील, लोकेश चौधरी, पियुष भोई, पूर्वेश कोळी, नैतीक कोळी, पियुष कोळी, रुपेश भोई, दुर्गेश पाटील आदींची उपस्थिती होती.


