चेन्नई-जोधपूर एक्स्प्रेसमध्ये राजस्थानच्या प्रवाशाचा चाकूहल्ल्यात मृत्यू : नंदुरबार स्थानकाजवळील घटना

आरोपींवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा नातेवाईकांचा पवित्रा


न्यूज नेटवर्क । नंदुरबार (4 फेब्रुवारी 2025) : चेन्नईहून जोधपूरकडे प्रवास करीत असलेल्या प्रवाशाचा जागा देण्याच्या कारणावरून वाद उफाळला व नंदुरबार आल्यानंतर हल्लेखोरांनी मारहाण करीत चाकू मारल्याने राजस्थानच्या प्रवाशाचा मृत्यू झाला. याप्रकरणी दोषी आरोपींना अटक होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे,

काय घडले प्रवासात
चेन्नईहून जोधपूरकडे प्रवास करत असताना बसण्याच्या जागेवरून वाद झाल्याने सुमेरसिंग जबरसिंग व सहकारी प्रवासी प्रबंतसिंग डोंगरसिंग परिहार (दोघे रा.बाकेसर, जि.जोधपूर, राजस्थान) या दोघांना येथील रेल्वेस्थानकावर सात ते आठ जणांच्या जमावाने मारहाण केली. संशयितांनी दोघांवर चाकूने वार केल्याने दोघे गंभीर जखमी झाले. हा प्रकार रविवारी सायंकाळी नंदुरबार स्थानकावर घडला. त्यांना लोहमार्ग पोलिसांनी रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.




सुमेरसिंग जबरसिंग (27) याच्या मांडीला गंभीर दुखापत झाली होती. अतिरक्तस्रावामुळे रविवारी रात्री उशिराने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संशयितांच्या शोधासाठी शहरात पोलिसांनी नाकेबंदी केली. मात्र सोमवारी उशिरापर्यंत त्यांना यश मिळाले नव्हते. पोलिसांनी रात्रीच संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

विवाहापूर्वीच झाला खून
सुमेरसिंग याचा 20 फेब्रुवारी रोजी विवाह होणार होता. सुमेरसिंगसह त्याचा भाऊ व त्याचे गावातील काही मित्र चेन्नई येथे मिठाई विक्री करून उदरनिर्वाह करतात. विवाह सोहळा 15 दिवसांवर आल्याने भावी जीवनाचे स्वप्न रंगवत सुमेरसिंग हा आपल्या घरी गावाकडे निघाला होता मात्र त्या आधीच ही घटना घडली.

 













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !