नंदुरबार शहरात साडेतीन लाखांच्या गांज्यासह संशयीत जाळ्यात

नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखा व शहर पोलिसांची संयुक्त कारवाई


Suspect caught with marijuana worth Rs 3.5 lakh in Nandurbar city नंदुरबार (4 फेब्रुवारी 2025) : शहरात कोम्बिंगदरम्यान नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेसह शहर पोलिसांनी एका संशयीताच्या घरातून तीन लाख 38 हजार रुपये किंमतीचा जप्त केला. या कारवाईने गांजा तस्करांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. सुदाम रमेश तिलंगे (56, कंजरवाडा, नंदुरबार) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

गोपनीय माहितीवरून कारवाई
नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना कंजरवाडा परिसरातील सुदाम तिळंगे याच्या घरात गांजा असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिले तसेच नंदुरबार शहर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत संशयीताच्या घरातून 16 किलो 900 ग्रॅम वजनाचा व तीन लाख 38 हजार रुपये किंमतीचा सुका गांजा जप्त करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त.एस, अपर पोलीस अधीक्षक आशीत कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, तसेच शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ व सहकार्‍यांनी केली. तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. स्वप्नील पाटील करीत आहेत.


कॉपी करू नका.