पाच हजारांची लाच भोवली : शहाद्यातील भूकर मापक नंदुरबार एसीबीच्या जाळ्यात

Five thousand rupees bribe : Land surveyor from Shahadya in Nandurbar caught by ACB शहादा (6 फेब्रुवारी 2025) : शेतमोजणीचे शीट तक्रारदाराला देण्यासाठी तडजोडीअंती पाच हजारांची लाच मागून ती स्वीकारताना शहाद्यातील भूमी अभिलेख कार्यालयातील भूकरमापकाला नंदुरबार एसीबीने गुरुवारी सायंकाळी अटक केली आहे. या कारवाईने लाचखोर हादरले आहेत. अभिजीत अर्जुन वळवी (43) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
असे आहे लाच प्रकरण
74 वर्षीय तक्रारदार यांच्या मालकीची हिंगणी शिवारात तालुका शहादा येथे गट नंबर 17 ही शेतजमीन आहे. यापूर्वी या शेताची आरोपी लोकसेवक वळणी यांनी मोजणी केली शेत मोजणीचे शीट तक्रारदार यांना दिलेले नाही. तक्रारदार यांनी त्यांच्या शेताच्या मोजणी बाबतचे शीट आरोपी लोकसेवक यांना मागितले असता वळवी यांनी सुरूवातीला दहा हजार रुपये लाच मागितली व पाच हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याने नंदुरबार एसीबीकडे तक्रार नोंदवण्यात आली. 6 रोजी लाच स्वीकारताच वळवी यास अटक करण्यात आली व त्याच्याविरोधात शहादा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा नंदुरबार एसीबीचे पोलीस उपअधीक्षक राकेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नेहा तुषार सूर्यवंशी, पोलीस निरीक्षक नरेंद्र खैरनार, सहा.उपनिरीक्षक विलास पाटील, हवालदार हेमंत महाले, हवालदार विजय ठाकरे, हवालदार देवराम गावीत, हवालदार संदीप खंडारे, हवालदार जितेंद्र महाले, हवालदार नरेंद्र पाटील, नाईक सुभाष पावरा आदींच्या पथकाने यशस्वी केला.