चोरवड येथे हॉटेलमधील वेटरमध्ये वाद : एकावर चाकूहल्ला ; आरोपीला अटक
Argument between waiters at a hotel in Chorwad : One stabbed; Accused arrested भुसावळ (6 फेब्रुवारी 2025) : भुसावळ तालुक्यातील चोरवड येथील हॉटेल भागाई येथे दोन वेटरमध्ये झालेल्या वादातून एकाने कांदा कापण्याच्या सुरीने दुसर्यावर हल्ला केल्याची घटना बुधवार, 5 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला अटक करण्यात आली.
असे आहे हल्ला प्रकरण
भुसावळ तालुक्यातील चोरवड येथील हॉटेल भागाई येथे नजाकत अली उर्फ बबलु युनूस अली (38, रा.अजमेर राजस्थान, ह.मु.हॉटेल भागाई, चोरवड) व कमलेश शालिग्राम जवरे (रा.देवूळ गुजरी, ता.जामनेर) हे दोघे कामाला आहेत. दोघांमध्ये नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणावरून वाद होत होते. त्यातच बुधवार, 5 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री एक वाजता उभयंतांमध्ये वाद झाला व कमलेश जवरे याने हॉटेलमधील कांदा कापण्याच्या सुरीने नजाकत अलीवर चाकूने तोंडावर आणि गालावर सपासप वार करून गंभीर जखमी करीत शिविगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी नजाकत युनूस अली याने दिलेल्या फिर्यादीवरून दुपारी 12 वाजता संशयित आरोपी कमलेश जवरे याच्या विरोधात भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेची माहिती कळताच भुसावळ तालुका पोलीस निरीक्षक महेश गायकवाड व सहकार्यांनी धाव घेतली.








