रावेर तालुक्यातील तरुणी अत्याचारातून गर्भवती : तरुणाविरोधात गुन्हा
![](https://breakingmaharashtra.com/wp-content/uploads/2021/12/balatkar.gif)
Young woman from Raver taluka becomes pregnant due to rape : Crime against young man रावेर (6 फेब्रुवारी 2025) : रावेर तालुक्यातील एका गावातील तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार करण्यात आला व पीडीात त्यातून गर्भवती राहिली. याप्रकरणी बुधवार, 5 फेब्रुवारी रोजी सायंकाळी निंभोरा पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात गुन्हा दाखल होताच त्यास अटक करण्यात आली.
काय घडले नेमके
रावेर तालुक्यातील एका गावाती 20 वर्षीय तरूणीला संशयित आरोपी अजय बळीराम साळवे (रावेर तालुका) याने लग्नाचे आमिष दाखवत नोव्हेंबर 2021 ते डिसेंबर 2024 च्या कालावधीत वेळोवळी अत्याचार केला. या अत्याचारातून पीडीता गर्भवती राहिली. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर पीडीतेने निंभोरा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आरोपी अजय साळवेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीदास बोचरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
![](https://breakingmaharashtra.com/wp-content/uploads/2025/02/mantri-niwad.jpg)