भुसावळ पालिकेच्या लेखापालास मारहाण


Bhusawal Municipality accountant beaten up भुसावळ (7 फेब्रुवारी 2025) : भुसावळ पालिकेच्या लेखापालाला कंत्राटदार ाच्या पुतण्याने शिविगाळ करीत मारहाण केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी नगरपालिकेच्या कार्यालयात घडली. या घटनेनंतर शहरात मोठी खळबळ उडाली असून दोषीवर कारवाईच्या मागणीसाठी सर्व पालिका कर्मचार्‍यांनी कामबंद करीत शहर पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी रात्री उशिरा शहर पोलिसात पालिकेचे लेखापाल हर्षल वाणी यांच्या फिर्यादीवरून भुसावळातील कंत्राटदार विनय बढे यांचे पुतणे रजत संजय बढेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

जिवंत जाळण्याची धमकी, मारहाणीचा आरोप
पालिकेतील सूत्रांच्या माहितीनुसार, भुसावळ पालिकेत लेखापाल हर्षल वाणी हे काम करीत असताना गुरुवारी दुपारी कंत्राटदार रजत बढे आले व त्यांनी परत गेलेला निधी मी परत आणतो व त्यासाठी पत्र द्यावे, अशी मागणी केली मात्र त्यावरुन वाणी व बढे यांच्यात शाब्दीक वाद झाला व याचवेळी रजत बढे यांनी शिविगाळ करीत टेबलावरील संगणक संच पाडून फाईल डोक्यावर मारली तसेच कानशीलात चापट मारून तू एकटा कसा बाहेर जातो म्हणत तुझे हातपात तोडू तुला गाडीसह जाळून टाकतो, अशी धमकी दिल्याचे वाणी यांनी तक्रारीत म्हटले आहे. या प्रकारानंतर संतप्त कर्मचार्यांनी शहर पोलीस ठाणे गाठत दोषीवर कठोर कारवाईची मागणी केली. तपास पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक ईकबाल सैय्यद करीत आहेत.


कॉपी करू नका.