भुसावळातील चेतन जैन यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान
![](https://breakingmaharashtra.com/wp-content/uploads/2025/02/chetan.gif)
Chetan Jain from Bhusawal honored by the Governor भुसावळ (7 फेब्रुवारी 2025) : भगवान महावीर स्वामी 2550 निर्वाण कल्याणक महोत्सव निमित्त आयोजित निंबध स्पर्धेचा राज्यस्तरीय पारितोषिक वितरण सोहळा व जिल्हा समितीतील सदस्यांचा सत्कार राजभवन, मुंबई येथे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी जळगाव जिल्ह्यात तसेच राज्यभरात समन्वय साधून निबंध स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल व सर्व शाळेमध्ये या स्पर्धेचा जास्तीत-जास्त प्रचार प्रसार केल्याबद्दल भगवान महावीर स्वामी 2550 निर्वाण कल्याणक महोत्सव जळगाव जिल्हा समितीचे सदस्य चेतन जैन, संजय जैन, अजय ललवाणी व प्रकाश छाजेड यांचा पदक देऊन सन्मान करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
राजभवनात कार्यक्रमास महाराष्ट्राचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम मंगल प्रभात लोढा, आमदार चैनसुख संचेती, जैन अल्पसंख्यांक विकास महामंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री) ललित गांधी, कार्यक्रम संयोजक हितेंद्र मोटा, समितीचे समन्वयक संदीप भंडारी उपस्थित होते. महाराष्ट्रातील विविध मान्यवर, जिल्हाधिकारी, राज्यातून उत्कृष्ट विद्यार्थी व त्यांचे पाल्य, शिक्षक, शाळेचे प्रमुख उपस्थित होते.
![](https://breakingmaharashtra.com/wp-content/uploads/2025/02/mantri-niwad.jpg)
पुरस्काराने अधिक काम करण्यास बळ : चेतन जैन
भगवान महावीर यांचे सत्य, अहिंसा, जगा आणि जगू द्याचे संदेश घरोघरी पोहोचवण्यासाठी निबंध स्पर्धा सांस्कृतिक मंत्रालय व भगवान महावीर निर्माण महोत्सव समितीच्या विद्यमाने घेण्यात आली. राज्यस्तरीय समिती व मान्यवरांनी आमच्या कामाची दखल घेत आमचा सन्मान केल्याने अधिक चांगले काम करण्यास बळ मिळाले, असल्याचे चेतन जैन म्हणाले. प्रत्येक कार्यात सहकार्य देणार्या शासकीय समिती सदस्य, जिल्हाधिकारी व विविध शिक्षणाधिकारी व निबंध स्पर्धेत भाग घेणार्या शाळा, शिक्षक गण व विद्यार्थी व समाजबांधवांचे आभार असल्याचे जैन म्हणाले.