वाचन व वचन संस्कृती जपली पाहिजे : प्रा.अरुणभाई गुजराथी

ग्रामगौरवचा ज्ञानमर्मी उपक्रम दिमाखदार पद्धतीने साजरा


Reading and speech culture should be preserved: Prof. Arunbhai Gujarathi जळगाव (7 फेब्रुवारी 2025) : समाजात वाचनसंस्कृती व वचनसंस्कृती जपली पाहिजे. सद्याच्या शिक्षणातून नव्या व सुदृढ समाजाची निर्मितीच प्रगतीची दिशा ठरवणार असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नेते, राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी केले.जळगाव जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात मोठे काम उभारणार्‍या महनीय व्यक्तींच्या व संस्थांच्या कामाला उजाळा मिळण्याच्या उद्देशाने ज्ञानमर्मी सन्मान सोहळा व सन्मान झालेल्या शिक्षण पंढरीच्या वारकर्‍यांची प्रेरणागाथा म्हणून काढण्यात येणार्‍या ’ज्ञानमर्मी’ विशेषांकाच्या मुखपृष्ठाचा अनावरण समारंभ येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात नुकताच पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रा. अरुणभाई गुजराथी बोलत होते.

यांची होती उपस्थिती
दापोली येथील डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा ज्येष्ठ कृषी व जलतज्ज्ञ डॉ.शंकरराव मगर यांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह व प्रत्येक सन्मानार्थी यांना वडाचे रोप भेट देण्यात आले.’ज्ञानमर्मी’ विशेषांकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा दूध संघांचे चेअरमन आ.मंगेशदादा चव्हाण यांच्या हस्ते संयुक्त करण्यात आले. जिल्हा परिषदेचे सीईओ श्री.अंकित,डायटचे प्राचार्य डॉ.अनिल झोपे,उच्च शिक्षण विभागाचे उपसंचालक डॉ. कपिल सिंघेल,माध्यमिक शिक्षणाधिकारी श्रीमती कल्पना चव्हाण,जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने,प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील, सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष शरद जिवराम महाजन मधुस्नेह संस्था परिवाराचे धनंजय चौधरी,कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.शैलेश राणे, ज्येष्ठ पत्रकार सुरेश उज्जैनवाल, जैन उद्योग समूहाचे जनसंपर्क विभागाचे उपाध्यक्ष अनिल जोशी,इकरा संस्थेचे अध्यक्ष डॉ.करीम सालार, उद्योजक रवींद्र नवाल आदी मान्यवर उपस्थित होते.

30 जणांना दिला ज्ञानमर्मी सन्मान
जिल्ह्यातील शिक्षणक्षेत्रात अग्रस्थानी स्व.बाळासाहेब मधुकरराव चौधरी,श्रीमंत प्रतापशेठ अग्रवाल, आचार्य गजाननराव गरुड अशा 24 दिवंगतांना स्मृती पित्यर्थ तर माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील ते माजी खा.डॉ.उल्हास पाटील यांच्यापर्यंत सद्या कार्यरत सहा मान्यवर असे एकूण तीस ज्ञानमर्मी सन्मान देण्यात आले.

ग्रामगौरव फाउंडेशनचे संस्थापक व ज्येष्ठ पत्रकार विवेक ठाकरे, सचिव सुभाष मराठे,क्रिएटिव्ह हेड वीरेंद्र पाटील,मंत्रालय ब्युरो चीफ रवींद्र चव्हाण, दिनेश दीक्षित फाउंडेशनच्या सचिव भाग्यश्री ठाकरे,दिनेश थोरात, सई नलवडे,विकास पाटील,प्रकाश पवार,बाळासाहेब पवार,दस्तगीर खाटीक,आकाश भंगाळे आदिनी पाहुण्यांचे स्वागत केले.आनंद शर्मा व तुषार भामरे यांनी तांत्रिक सहकार्य केले. प्रास्ताविक ज्ञानमर्मी उपक्रमाच्या संयोजिका धनश्री ठाकरे यांनी केले. सूत्रसंचालन संदीप केदार यांनी केले, आभार सुनील गरुड यांनी मानले.


कॉपी करू नका.