पोलिसच असुरक्षित : वाहन अडवल्याच्या रागातून वाहतूक पोलिसाच्या डोक्यात टाकला दगड


Crime on the rise : Fatal attack on traffic policeman पुणे (7 फेब्रुवारी 2025) : फोनवर बोलत दुचाकी चालवणार्‍या व्यक्तीला रोखल्याच्या रागातून पुण्यात वाहतूक पोलिसावरच प्राणघातक हल्ला करण्यात आल्याने पोलीस वर्तुळात संतापाची लाट पसरली आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या वाहतूक पोलिसाचे नाव राजेश गणपत नाईक आहेत. पुण्यातील फुरसुंगी भेकराईनगर चौकात हा प्रकार घडला.

डोक्यात घातला दगड
पुण्यातील फुरसुंगी भेकराईनगर चौकात राजेश नाईक हे कर्तव्यवर असताना त्यांना एक दुचाकी चालक फोनवर बोलत गाडी चालवताना दिसला. तेव्हा त्यांनी त्याला अडवले. मात्र, याचा राग येऊन दुचाकी चालकाने रस्त्यात पडलेला दगड वाहतूक पोलिस राजेश नाईक यांच्या डोक्यात मारला. यात राजेश नाईक गंभीर जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आरोपी फरार झाला असून त्याचा शोध पोलिस घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण नशेमध्ये होता. तसेच मगरपट्टा या भागात या तरुणाने एका वृद्ध नागरिकाला मारहाण केली होती तसेच रस्त्यावरून जणार्‍यांना देखील दगड फेकून मारत होता.


कॉपी करू नका.