दिल्ली विधानसभेत सत्ताबदलाची शक्यता : भाजपा 40 जागांवर आघाडीवर

दिल्ली (8 फेब्रुवारी 2025) : दिल्ली विधानसभेतील चुरशीच्या निवडणुकीचे निकाल समोर येत असून त्यात 40 जागांवर भाजपा तर 30 जागांवर आप आघाडीवर आहे. दिल्ली यावेळी परिवर्तन होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. भाजपाने सुरुवातीलाच जोरदार आघाडी घेतली आणि बहुमताचा आकडा ओलांडला आहे.
भाजपाला बहुमत मिळण्याची शक्यता
शनिवारी सकाळी 11 वाजेपर्यंत समोर आलेला कल पाहता भारतीय जनता पक्ष स्पष्ट बहुमत प्राप्त करेल, असं चित्र दिसत आहे. भारतीय जनता पक्ष सध्या आघाडीवर आहे. जर हा कल असाच राहिला तर भारतीय जनता पक्षाचं सरकार दिल्लीत येऊ शकतं. त्यामुळे देशाच्या राजधानीत अर्थात भाजपाचा मुख्यमंत्री कोण असेल? याबाबत आता चर्चा सुरू झाल्या आहेत.
मुख्यमंत्री पदासाठी कोणाचे नावं चर्चेत?
दुष्यंत कुमार गौतम
परवेश वर्मा
अरविंदर सिंग लवली
विजेंदर गुप्ता
सतीश उपाध्याय
या कारणांमुळे आपला जनतेने नाकारले
दिल्लीतील तथाकथित ‘लिकर घोटाळा’ हा आम आदमी पक्षाच्या पतनाला जबाबदार ठरला. माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि अनेक वरिष्ठ नेत्यांवर आरोप झाले. ईडी व सीबीआयच्या तपासांमुळे ‘आप’च्या प्रतिमेला तडा गेला. भाजपाने निवडणुकीदरम्यान हा मुद्दा जोरदारपणे मांडला, ज्यामुळे मतदारांचा कल बदलला.
आतिषी मुख्यमंत्री पदावर, पण प्रभावी ठरल्या नाहीत
लिकर घोटाळ्याच्या आरोपांनंतर अरविंद केजरीवाल यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आतिषी यांची मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली. मात्र त्या जनतेचा विश्वास संपादन करण्यात अपयशी ठरल्या. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरही त्या मोठे निर्णय घेऊ शकल्या नाहीत, याचा फटका ‘आप’ला बसला.
विशेष म्हणजे, केजरीवाल यांच्या पत्नीचे नाव चर्चेत आले असतानाही ‘आप’ने आतिषी यांना पुढे आणले आणि आम्ही घराणेशाहीला पाठिंबा देत नाही, असा संदेश दिला. मात्र हा डाव फारसा यशस्वी ठरला नाही.
अण्णाजारेंचा प्रभाव : केजरीवाल यांची प्रतिमा डागाळली
अण्णा हजारे यांनी 2011 मध्ये दिल्लीमध्ये मोठे भ्रष्टाचारविरोधी आंदोलन केले होते, ज्यातून ‘आप’चा जन्म झाला. मात्र, या निवडणुकीत अण्णा हजारेंनी केजरीवाल यांच्यावर थेट निशाणा साधला. केजरीवाल आता भ्रष्टाचाराविरोधी नाहीत, तर संधीसाधू राजकारणी बनले आहेत असा आरोप त्यांनी केला.
हे विधान ‘आप’च्या प्रतिमेवर परिणाम करणारे ठरले. केजरीवाल यांच्या प्रामाणिक प्रतिमेला धक्का बसल्याने त्यांचे पारंपरिक मतदारही नाराज झाले.
https://x.com/ANI/status/1888086796162208016?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1888086796162208016%7Ctwgr%5Eb0e98302f15e81a220d311537f08c04daf5d9aa6%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.lokmat.com%2Fnational%2Fdelhi-assembly-election-2025-result-update-counting-of-votes-begins-for-delhi-assembly-elections-a-a301%2F


