जुन्या भांडणाच्या वादातून विद्यार्थ्याला मारला चाकू


Student stabbed to death over old dispute जळगाव (8 फेब्रुवारी 2025) : जुन्या भांडणाचा राग मनात धरला होता. शाळा सुटल्यानंतर एकाने विद्यार्थ्यांला धरत हाणामारी केली. दप्तरमधून चाकू काढत पाठीवर डोक्यावर वार केल्याने यात 15 वर्षीय विद्यार्थी जखमी झाला. ही थरारक घटना गुरुवार, 6 रोजी संध्याकाळी 5.15 वाजेच्या सुमारास कुसुंबा येथे एका माध्यमिक विद्यालयाच्या परिसरात घडली.

15 वर्षीय विद्यार्थी हा कुसुंबा येथील श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालय येथे शिक्षण घेतो. गुरुवारी नेहमीप्रमाणे तो विद्यालयात गेला होता. संध्याकाळी शाळा सुटली. सर्व मुले शाळेतील वर्गातून बाहेर पडून विद्यालयाच्या आवारात आले. हा विद्यार्थीही आवारातून मित्रांसोबत गप्पा करत घरी जात होता. जुन्या भांडणाचा राग मनात ठेवलेला याच विद्यालयातील एक विद्यार्थी या विद्यार्थ्याजवळ येत शिवीगाळ करु लागला. हे चित्र दिसतास अन्य विद्यार्थ्यांनी याठिकाणी धाव घेत गर्दी केली.

या गर्दीचा फायदा घेत संशयित मुलाने चापटाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याच्या शालेय बॅगमधुन त्याने चाकूसारखी धारदार वस्तू हातात घेत वासुदेव याच्यावर वार करु लागला.

विद्यार्थ्याच्या उजव्या पायाच्या गुढघ्याजवळ, पोटाचे डाव्या भागावर, पाठीवर तसेच डोक्यावर दुखापत झाली आहे. हा थरार पाहिल्याने अनेक विद्यार्थी गर्भगळीत झाले. काही विद्यार्थ्यांनी घराकडे पळत जात प्रकार पालकांच्या कानावर टाकला. दप्तरमध्ये आणलेल्या धारदार वस्तूने विद्यार्थ्यावर वार केले, हे प्रत्यक्षदर्शी मुलांनी सांगितल्याने पालक धास्तावले.

रक्तबंबाळ अवस्थेत गुरुवारी संध्याकाळी जखमी विद्यार्थ्याला तत्काळ उपचारार्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले. त्याच्यावर तातडीने उपचार सुरु झाला. या विद्यार्थ्याची प्रकृती स्थिर असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले. विद्यार्थ्याच्या शरीरावर ठिकठिकाणी जखमी केल्याने कुटुंबातील सदस्यांना संताप झाला. त्यांनी भीतीही व्यक्त केली. या प्रकरणी तक्रारीनुसार संशयित विद्यार्थ्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, सहायक पोलीस निरीक्षक गणेश वाघ यांनी घटनास्थळी जावून प्रकार जाणून घेतला. हवालदार मुकुंद पाटील हे तपास करीत आहेत.


कॉपी करू नका.