कोठडीत महिलांना मारहाण : दोन पोलीस उपनिरीक्षकांसह पाच कर्मचारी निलंबित


Women beaten in custody: Five employees including two police sub-inspectors suspended परभणी (10 फेब्रुवारी 2025) : परभणीत 10 डिसेबर रोजी झालेल्या संविधान शिल्पाच्या विटंबनेनंतर झालेल्या हिंसक आंदोलनात अटक केलेल्या महिलांना कोठडीत मारहाण झाल्याची तक्रार न्यायालयात करण्यात आल्यानंतर दोन पोलीस उपनिरीक्षकांसह पाच कर्मचार्‍यांना निलंबित करण्यात आले आहे. नवा मोंढा पोलीस ठाण्यातील हे कर्मचारी आहेत.

यांना केले निलंबित
पोलिस उपनिरीक्षक कार्तिकश्वर तुरनर, उपनिरीक्षक सुलोचना गाडेकर, अंमलदार सतीश दैठणकर, मोहित पठाण, राजेश जटाळ अशी निलंबित कर्मचार्‍यांची नावे आहेत. पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी निलंबनाच्या कारवाईला पुष्टी दिली, मात्र त्याचे कारण सांगण्यास नकार दिला.


मारहाणीमुळेच निलंबन
नवा मोंढा पोलिस ठाण्याच्या कोठडीत मारहाण झालेल्या महिलांनी याप्रकरणी महिनाभरापूर्वी वकिलामार्फत पोलिस अधीक्षक कार्यालयात तक्रार दाखल केली होती. त्याची दखल घेत ही कारवाई केली, अशी माहिती याचिकाकत्यांचे वकील अ‍ॅड. ाजकुमार जोंधळे यांनी दिली. दरम्यान, याच आंदोलनातील आणखी एक कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशी यालाही अटक केली होती. त्याचा कोठडीत मृत्यू झाल्याचा कुटुंबीयांचा दावा आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !