एमआयडीसी पोलिसांची मोठी कामगिरी : अवैध गॅस रिफिलिंग सेंटरमधून पावणेदोन लाखांचा साठा जप्त


Stock worth Rs 2.5 lakh seized from illegal gas refilling center जळगाव (10 फेब्रुवारी 2025) : घरगुती सिलिंडरचा अवैध साठा करून त्यामधून गॅस वाहनात भरण्याचा व्यवसाय सुरू असताना एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने छापा टाकून एक लाख 64 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. शनिवार, 8 रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास ही कारवाई राजपूत गल्ली, रामेश्वर कॉलनी येथे करण्यात आली.

अवैध गॅस रिफिलिंग करणार्‍यांच्या गोटात खळबळ
व्यावसायिक सीलबंद 24 गॅस सिलिंडर, 19 भारत गॅस कंपनीचे सिलिंडर, एचपीचे दोन भरलेले सिलिंडर, तसेच रिकामे सिलिंडर, इलेक्ट्रिक मोटार असा मुद्देमाल हस्तगत केला. या प्रकरणी किरण भागवत पाटील (वय 51, रा. रामेश्वर कॉलनी) याच्यावर अत्यावश्यक अधिनियमानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.


यांनी केली कारवाई
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप पाटील, उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, अशोक काळे, हवालदार राजेंद्र कांडेकर, पोलीस नाईक हेमंत जाधव, पोलीस नाईक योगेश बारी, कॉन्स्टेबल सिध्देश्वर डापकर, कॉन्स्टेबल योगेश घुगे यांच्या पथकाने केली. पोलीस उपनिरीक्षक अशोक काळे हे तपास करीत आहेत.

 









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !